शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेमध्ये ९०० वाढीव सुरक्षारक्षकांची मागणी

By admin | Updated: November 12, 2015 02:36 IST

महापालिकेच्या सुरक्षा विभागाने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास परवानगी देण्यात आली असता दोन हजार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असल्याने त्यांचे

पुणे : महापालिकेच्या सुरक्षा विभागाने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास परवानगी देण्यात आली असता दोन हजार सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली असल्याने त्यांचे बिल अदा करण्यास काही नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या विविध विभागांनी सुरक्षा विभागाकडे १५६ प्रस्ताव देऊन साडेआठशे ते नऊशे वाढीव सुरक्षारक्षक देण्याची मागणी केली असल्याची माहिती उजेडात आली आहे.महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या दोन हजार सुरक्षारक्षकांच्या वेतनापोटी १८ कोटी रुपयांची रक्कम स्थायी समितीने मंजूर केली. याला विरोध करून स्थायी समितीच्या काही सदस्यांनी फेरविचाराचा प्रस्ताव स्थायीकडे दाखल केला आहे. मुख्य सभेने १,५०० सुरक्षारक्षक नेमण्यास मंजुरी दिली असताना दोन हजार सुरक्षारक्षक भरण्यात आल्याने त्याला विरोध केला जात आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालये, उद्याने, रुग्णालये, जलशुद्धीकरण केंद्रांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेकडून कंत्राटी पद्धतीने या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येते. महापालिकेचा व्याप वाढत असल्याने सुरक्षारक्षकांची मागणीदेखील वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या विविध विभागांच्या खातेप्रमुखांनी सुरक्षा विभागाकडे १५६ प्रस्ताव सादर करून सुरक्षारक्षक पुरविण्याची मागणी केली आहे. काही विभागांना तातडीची गरज असल्याने भरती प्रक्रिया राबवून ५२० जणांची नेमणूक करण्यात आली. पूर्वी महापालिकेकडे १,६०० सुरक्षारक्षक कार्यरत होते. नव्याने भरती झालेल्या ५२० जणांसह सध्या महापालिकेतील सुरक्षारक्षकांची संख्या दोन हजारांपर्यंत पोहोचली आहे. विविध विभागांच्या मागणीनुसार अजून साडेतीनशे सुरक्षारक्षक कमी आहेत. मात्र, सध्या पालिकेतील भरती बंद करण्यात आली आहे. वाढीव सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आणली जाऊ नये, अशी मागणी सुरक्षारक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)