शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात ९० टक्के बस मार्गावर येतील

By admin | Updated: June 9, 2015 05:55 IST

महिनाभरात ९० टक्के बस मार्गावर आणणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली.

पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील किरकोळ दुरुस्तीअभावी जागेवर उभ्या असलेल्या बस दुरुस्त करण्याला प्राधान्य देत महिनाभरात ९० टक्के बस मार्गावर आणणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली. सात वर्षांत सहाव्यांचा बदली झालेल्या कृष्णा यांनी ‘मी परिस्थितीचा विचार करीत नाही. परिस्थिती बदलून दाखवितो,’ असा ठाम विश्वासही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.पीएमपीचे चौदावे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. राज्य शासनाने मागील २० दिवसांपूर्वी त्यांची सीएमडी म्हणून नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारण्यास त्यांना विलंब होत असल्याने विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने पदभार स्वीकारण्यास वेळ लागल्याचे कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यांची मागील सात वर्षांत सहा पदांवर बदली झाली आहे. ‘मी कधीही कुठल्या पदाचा आग्रह धरत नाही किंवा बदलीची मागणी करीत नाही. जी जबाबदारी मिळेल ती पार पाडतो. पीएमपीची जबाबदारी स्वीकारण्याबाबतही कधी नकारात्मक दृष्टिकोन नव्हता,’ असे कृष्णा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. कृष्णा यांनी पहिल्या दिवशी सर्व विभागप्रमुख, अधिकारी, तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चाही चर्चा करून कामकाजाची माहिती घेतली. महिनाभरात ९० ते ९५ टक्के बस मार्गावर आणण्याचे पहिले उद्दिष्ट असणार आहे. ताफ्यात काही बस दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्या दुरूस्त करून मार्गावर आणण्याला प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.हायटेक पीएमपी हे स्वप्न...पीएमपीची बससेवा हायटेक असली पाहिजे. ताफ्यातील प्रत्येक बसला ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचे स्वप्न असल्याचे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. पीएमपीचा प्रत्येक आगार, कार्यालय, बस, बसथांबा, मार्ग फलक मॉडर्न असायला हवी. सध्या माहितीचे खूप स्रोत आहेत. त्याचा उपयोग व्हायला हवा. आयटी हे आवडीचे क्षेत्र असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. हे लगेच शक्य नसले, तरी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, असे कृष्णा यांनी सांगितले.मुख्यमंत्री सकारात्मक...पीएमपीच्या स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. पीएमपीमध्ये सुधारणा व्हायला हवी, असे त्यांंचेही मत असून ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पीएमपी सुधारण्यासाठी सहकार्य मिळेल, असे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. पालकमंत्रीही खूप सकारात्मक आहेत. डॉ. श्रीकर परदेशी यांनी पीएमपी सुधारू शकते हे दाखवून दिले आहे. त्यांच्याशीही सातत्याने संपर्कात असून, यावर चर्चाही केली आहे, असे कृष्णा यांनी नमूद केले.... तर शेवटी वेतन कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी कृष्णायांच्याकडे केली. त्यावर कृष्णा यांंनी ‘कंपनीला पुढे न्यायचे असेल, तर सीएमडीला शेवटी वेतन मिळायला हवे. जर सीएमडीला सुरूवातीला वेतन मिळाले तर इतर सर्वांना वेळेवर वेतन मिळते, असा त्याचा अर्थ होतो,’ असे सांगत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतरच स्वत: वेतन घेणार असल्याचे संकेत दिले.अधिकारी आताव्हॉट्स अ‍ॅपवर...अभिषेक कृष्णा यांनी पहिल्याच दिवशी सर्व अधिकारी, तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर स्वतंत्रपणे ग्रुप करण्याच्या सूचना दिल्या. काही तक्रारी किंवा अडचणी असतील, तर या ग्रुपवरच चर्चा करता येईल. तसेच एखाद्या विषयावर सर्व अधिकाऱ्यांशी तातडीने बोलायचे असल्यास गु्रपवर चर्चा होऊ शकते. प्रत्येक वेळी कार्यालयात येऊन टेबलवर बसून चर्चा करून उपयोग नाही. यामध्ये वेळेचा खूप अपव्यय होतो, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले.