शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर बाजार समितीसाठी ९७ % मतदान

By admin | Updated: September 16, 2015 02:45 IST

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ११ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही

जुन्नर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ११ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ९७ टक्के मतदान झाले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. रिंगणातील ४७ उमेदवारांचे नशीब मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.३ हजार ८५६ मतदार असलेल्या या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघात सर्वसाधारण -७, महिला -२, इतर मागासप्रवर्ग -१, व्हीजेएनटी-१ अशा एकूण ११, ग्राम पंचायत मतदार संघात सर्वसाधारण -२, अनुसुचित जाती जमाती- १, आर्थिक दुर्बल घटक -१ अशा एकूण -४, व्यापारी मतदार संघ-२ व हमाल मापारी मतदार संघ-१ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली आहे.सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी १८,महिला प्रतिनिधी गटातील दोन जागांसाठी ४, इतर मागासवर्गीय गटातील एका जागेसाठी २ तर विमुक्त जाती-भटक्याी जमाती गटातील एका जागेसाठी ३ उमेदवार तर ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी ७ ,अनुसूचित जाती गटातील एका जागेसाठी ३,तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील एका जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी मतदारसंघातील एका जागेसाठी ४ , तर हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी २ उमेदवार असे एकूण ४७ उमेदवार निवडणुकीत उभे होते. व्यापारी -अडते मतदारसंघात १५३७ पैकी १४२८ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९२.९० आहे. हमाल-मापारी मतदारसंघातून २७५ पैकी २७२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९८.९१ आहे. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ८९७ पैकी ८९६ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.८८ आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ११४७ पैकी ११०४ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९६.२५ आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वच नेत्यांनी प्रतिष्ठेची व अस्तित्वाची केली. तीनही पॅनलचे कार्यकर्ते मतदान खेचण्यासाठी धडपड होते. मतदारांची बडदास्त ठेवली जात होती. महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. सोसायटी व ग्रामपंचायत गटांत चुरशीने मतदान झाले. (वार्ताहर)