शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत ८७३ उमेदवार निवडणूक रिंगणात

By admin | Updated: July 25, 2015 04:55 IST

हवेली तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका, तर ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका अशा एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका, तर ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका अशा एकूण ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत. त्यामध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८३५, तर पोटनिवडणुकीसाठी ३४ असे एकूण १,८६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांतील १,८०९ अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ८०५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ८७३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.अष्टापूर, डोणजे, जांभळी, सागरूण या चार गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच कल्याण वगळता फुरसुंगी, आव्हाळवाडी, वाडेबोल्हाई, मालखेड, खामगाव मावळ, बुर्केगाव, होळकरवाडी या गावांच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यांच्यासमवेत विविध गावांतील १३१ सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार व निवासी नायब तहसीलदार दिलीप बांदल यांनी दिली.उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (२३ जुलै) हवेलीतील ५७ ग्रामपंचायतीचे इच्छुक ऊमेदवार त्यांचे कार्यकर्ते व पॅनलप्रमुख यांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे शिवाजीनगर येथील शासकीय गोदाम आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. पॅनलमधील उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. पॅनलविरहित अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना ते विनंती करताना दिसत होते. प्रसंगी एखाद्या पदाचे आमिष दाखवून त्यांना माघार घेण्यासाठी भाग पाडल्याची नीतीही काहींनी अवलंबली, तर यासाठी काहींनी साम-दाम-दंड-भेद यांचाही वापर केला. ज्यांची उमेदवारी निश्चित ते खूष, तर ज्यांना डावलले गेले ते तुमच्या विरोधकांचा खुलेआम प्रचार करणार, अशा धमक्या देऊन नाराजीने परतताना दिसत होते. यामुळे पॅनलप्रमुखाच्या चेहऱ्यावरही नाराजीची छटा दिसत होती. (वार्ताहर)