शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात ८ तास मिरवणूक

By admin | Updated: September 10, 2014 00:50 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद सर्व नागरिकांना घेता यावा, याकरिता मिरवणूक लवकर सुरु करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या.

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया़़़ मंगलमुर्ती मोरया़़़ पुढच्या वर्षी लवकर या़ चा जयघोष ढोल लेझिम -ताशाच्या निनाद आणि डिजेचा आवाज व कार्यकर्त्यांचा उत्साह या मंगलमय वातावरणात शहरातगणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला़ येथे आठ तास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती़गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद सर्व नागरिकांना घेता यावा, याकरिता मिरवणूक लवकर सुरु करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साहामुळे या मिरवणुका दरवर्षीप्रमाणचे सायंकाळी ४ वाजता सुरु झाल्या़ पाच वाजता मानाचा पहिला रायवुड गणेश उत्सव मंडळाचा गणपती मावळा पुतळा चौकात दाखल झाला़ मानाचा दुसरा तरुण मराठा मित्र मंडळ, रोहिदास तरुण मंडळ, शेतकरी भजनी मंडळ व गवळीवाडा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानाचे पाच गणपती रांगेत मिरवणुकीसाठी दाखल झाले़ प्रत्येक गणेश मंडळांसमोर ढोल- लेझिम पथकांचे खेळ सुरु होते़ मंगलमय वातावरणात मिरवणुका सुरु झाला. सकाळपासून कोसळणाऱ्या वरुणराजाने विश्रांती घेतल्याने मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ गणेश भक्तांच्या स्वागतासाठी रामदेवबाबा भक्त मंडळाच्या वतीने भेळ, तर लायन्स क्लब लोणावळा-खंडाळाच्या वतीने चहाचे वाटप करण्यात आले़ जयचंद चौकात लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने भाविकांसाठी ३ हजार किलोचा महाप्रसाद बनविला होता़ लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फ ाटक यांच्या हस्ते ह्या महाप्रसादाचे वाटप करत उद्घाटन करण्यात आले़ शिवाजी चौकात लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा नगरपरिषद, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा लोणावळा मंडळ, भाजपा महिला आघाडी, मनसे, स्वभिमानी रिपब्लिकन पार्टी व स्वाभिमान संघटना यांनी स्वागत कक्ष उभारले होते़ नगराध्यक्ष अमित गवळी, उपनगराध्यक्ष शंकूतला इंगूळकर, कॉग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस किरण गायकवाड, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली दाभाडे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, रवींंद्र भेगडे, सुरेखा जाधव, शोभा दळवी, दादा धुमाळ, शौकत शेख, रमेश म्हाळसकर, अंकुश चव्हाण आदींनी या वेळी गणेश मंडळाचे स्वागत करत त्यांचा सत्कार केला़ उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे व पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.(वार्ताहर)