शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

रोहिदासमहाराजांची ६४० वी जयंती उत्साहात

By admin | Updated: February 13, 2017 01:21 IST

तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रोहिदासमहाराज

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रोहिदासमहाराज यांची ६४० वी जयंती विविध उपक्रमांतून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे माऊलींची महापूजा, गुरू गोविंदबाबा महापूजा, संत रोहिदासमहाराज प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व मृदंगपूजन अशा विविध धार्मिक उपक्रमांनंतर अलंकापुरीत प्रथमच भव्य पखवाज (मृदंग) वादन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते.पुणे जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे साडेतीनशे मृदंगवादकांनी यात सहभाग घेतला होता. संपूर्ण दिवसभर विविध ताल, लय, सूर व रामकृष्णहरी भजनाचे बोल, सरपटी व जलद धुमाळी मात्रा, ठाय धुमाळी मात्रा, स्पेशल सोलो वादन व स्वतंत्र मात्रा अशा निरनिराळ्या तालांनी मृदंगवादनाचा अखंड गजर कानी पडत होता. स्पर्धेेनंतर विजेत्यांना ट्रॉफी, दोन पखवाज, रोख रक्कम, तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग आबनावे, नगरसेवक डी. डी. भोसले, माजी नगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, अतुल लोणकर, शंकर येळवंडे, नगरसेवक पांडुरंग वहिले, सुरेश गाडेकर, विश्वनाथ नेटके, अरुण बडगुजर, महादेव पाखरे, तुकाराम नेटके, संदीपानमहाराज घायाळ, चंद्रकांत कानडे, नारायण गाडेकर, महेश केदारी, मारुती पाचारणे, शिवाजी गवळी, चेतन कानडे, तुषार नेटके, पंकज पाखरे, लक्ष्मण नेटके आदींसह भाविक-नागरिक व वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. स्पर्धेत परीक्षक म्हणून पंडित दास्तोपंत यांनी काम पाहिले.(वार्ताहर)