शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

६०% मतदानाचेच नियोजन

By admin | Updated: February 14, 2017 02:22 IST

शहरातील एकूण मतदारसंख्या आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले नियोजन पाहता, आयोगानेच केवळ ६० टक्के मतदान होईल

पुणे : शहरातील एकूण मतदारसंख्या आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले नियोजन पाहता, आयोगानेच केवळ ६० टक्के मतदान होईल असे गृहीत धरले असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे १०० टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृती अभियान विविध पातळ्यांवर राबविले जात असताना प्रत्यक्षात त्याबाबतचे नियोजनच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीत एका मतदाराला ४ मते द्यायची आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदाराला सव्वा मिनिटाचा वेळ लागणार असल्याचे विविध महापालिकांकडून घेण्यात आलेल्या डेमोमध्ये दिसून आले आहे. एका मतदान केंद्रांवर सरासरी ७५० ते ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी ठेवण्यात आली आहे. मतदानाचा दहा तासांच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात ४५० ते ५०० मतदारच मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे आयोगाच्या नियोजनानुसार निर्धारित वेळेत केवळ ६० टक्के इतकेच मतदान होऊ शकेल असे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने निवडणुकीची मतदान केंद्रे वाढविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी लोकायत व सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना आयोगाची यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून येत नाही. चार सदस्यीय मतदान पद्धतीचा यंदा पहिल्यांदाच अवलंब होत असतानाही त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दखल घेण्यात आलेली नाही. मतदानासाठी प्रत्यक्षात जास्त वेळ लागणार असताना त्यानुसार नियोजन करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या निवडणुकीसाठी साडेतीन हजार मतदान केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी लागणारी पुरेशी मतदान यंत्रेही उपलब्ध नाहीत, त्यामुळे एकाच प्रभागातील दोन गटांसाठी एकच मतदान यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)