शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून ६ सल्लागार काळ्या यादीत

By admin | Updated: June 19, 2014 05:17 IST

महापालिकेतील काही सल्लागारांनी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे चुकीचे व वाढीव दरपत्रक (इस्टिमेट) तयार केले.

पुणे : महापालिकेतील काही सल्लागारांनी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे चुकीचे व वाढीव दरपत्रक (इस्टिमेट) तयार केले. त्यामुळे ठेकेदाराची जादा दराने बिले मंजूर होऊन महापालिकेचे अर्थिक नुकसान होण्याचा ठपका सहा सल्लागारांवर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या लेखा परीक्षणातून हा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधितांवर दोन वर्षे निलंबनाची कारवाई करून त्यांना काळ््या यादीत टाकण्यात आले आहे. पथ विभागाने रस्त्याची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदारांचे दरपत्रक व बिले तपासून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागारांना मानधन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र सल्लागारांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी जादा दराची बिले तयार करून महापालिकेचे अर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न लेखा परीक्षणातून उजेडात आला आहे. त्यामुळे संबंधित कामांचे सल्लागार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली होती. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी त्याविषयी चौकशीचे आदेश दिले होते. प्रथमदर्शनी चूक झाल्याचे निदर्शनास आल्याने सहा सल्लागारांना दोन वर्षांसाठी निलंबित करून काळ््या यादीत टाकले आहे. (प्रतिनिधी)