शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोंबिंग ऑपरेशनमध्ये ५५ गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाने बुधवारी मध्यरात्री राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात ५५ गुन्हेगारांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाने बुधवारी मध्यरात्री राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यात ५५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या कारवाईत एक पिस्तूल, ३१ कोयते, ४ तलवारी, पालघन, सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली. तसेच तडीपार केले असतानाही ९ गुंड शहरात वावरत असल्याचे आढळून आले असून त्यांना अटक केली आहे. तसेच, ३०८ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोंबिंग ऑपरेशनचा आदेश दिला होता. त्यानुसार बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी पहाटे १ वाजेपर्यंत ऑपरेशन राबविण्यात आले. तसेच ४१७ हॉटेल, लॉज, ढाबे, एसटी, रेल्वे बसस्थानके, तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एकूण २ हजार ३८९ गुन्हेगार तपासण्यात आले. त्यापैकी ८१९ गुन्हेगार मिळून आले. हडपसर परिसरातील आरोपीकडून १ पिस्तूल जप्त करण्यात आले. हत्यारे बाळगणाऱ्र्या ३७ जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ गुंडांना अटक करण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक मल्लेश देवकर (वय २५, रा. इंदिरानगर, लोहगाव) याच्याकडून २० हजार रुपयांचा १ किलो ९७५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभिजित सुभाष गोरविले (वय २०, रा. शिवदर्शन, पर्वती) याच्या ताब्यातून ११ हजार १०० रुपयांचा ५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, नामदेव चव्हाण, डॉ. संजय शिंदे तसेच सर्व पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येऊन गुन्हेगारांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.