इंदापूर : खडकवासला साखळी धरणात १५.१३ टीएमसी पाणीसाठा आहे. ५१.८८ टक्के पाणी आहे. शेती, पिण्यास व उद्योग धंद्यासाठी २० जुलैपासून खडकवासला नवीन मुठा कालव्यातून १,४०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडले जात आहे. ते महिनाभर चालणार आहे. पुणे शहरास पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा खडकवासला साखळी धरणात निर्माण झाला आहे. मात्र पाऊस झाला नाही तर कालव्यावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.या संदर्भात ह्यलोकमतह्णशी बोलताना येथील खडकवासला कालवा उपविभाग क्र. ३ चे उपविभागिय अभियंता के. के. देवकाते यांनी पावसाअभावी होणाऱ्या प्रतिकूल परिणामाविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, २० जुलै रोजी इंदापूर परिसरात पाणी आवर्तन आले. ते ८ आॅगष्ट पर्यंत चालले. या कालावधीत इंदापूर शहरासाठी तरंगवाडी तलावात पाणी सोडण्यात आले. या खेरीज विद्या प्रतिष्ठान, इंदापूर कृषी उत्पन्न समितीसह न्हावी, रुई, बोराटवाडी, पारवडी, शेटफळगढे, निंबोडी, कटफळ, वडापूरी, बळपुडी, अकोले, गागरगाव या गावांच्या पाणी योजनांना पाणीपुरवठा करण्यात आला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या काळात पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. खडकवासला नवा मुठा कालव्यातून एरव्ही दोनच पाणी आवर्तने मिळतात. योग्य नियोजनामुळे यंदा चार आवर्तने मिळाली. खडकवासला लाभक्षेत्रातील पिकांची आजची परिस्थिती समाधानकारक असली तरी पावसाची नितांत आवश्यकता आहे. पावसाअभावी सर्व नियोजन कोलमडून जावू शकते.
खडकवासला प्रकल्पात ५१.८८ टक्के पाणीसाठा
By admin | Updated: August 18, 2015 03:44 IST