शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ९७ बुथवर टोचली जाणार ४० लाख पुणेकरांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतच्या लसीकरणाची तयारी केली आहे. एकूण २ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतच्या लसीकरणाची तयारी केली आहे. एकूण २ हजार ९७ बूथच्या माध्यमातून प्रत्येक पुणेकरापर्यंत कोरोनाची लस पोहोचवली जाणार आहे. याव्दारे शहरातील ४० लाख ३९ हजार ५९९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़

पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ़ आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात शासनाच्या सूचनांनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे़ याकरिता महापालिकेकडे साधारणत: ४२ हजार जणांनी नोंदणी केली असली तरी, महापालिकेने शहरात १७९ ठिकाणी लसीकरण बूथ उभारून याव्दारे ५५ हजार ५८८ जणांना लस देण्याची व्यवस्था केली आहे़ हे काम साधरणत: चार दिवस चालेल.

दुसऱ्या टप्प्यात २५६ बूथ, १ हजार २४ मनुष्यबळासह २५६ स्वयंसेवक (लसीकरण पूर्ण करण्याचा कालावधी पाच दिवस), तिसऱ्या टप्प्यात २६९ बूथ २६९ स्वयंसेवक व १ हजार ७६ मनुष्यबळाची (लसीकरण पूर्ण करण्याचा कालावधी सहा दिवस) गरज लागणार आहे़ यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी ३४८ बूथ उभारणी करून, ९ लाख ३२ हजार ७१८ जणांना ८ दिवसात लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल़

चौथ्या व अंतिम टप्प्यात कोरोनावरील लस सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याने, शहरातील प्रत्येक प्रभागात यासाठी बूथ उभारणी होईल. ही संख्या साधारणत: २ हजार ९७ इतकी राहणार आहे़ २३ दिवस चालणाऱ्या या लसीकरणासाठी ४ हजार १७९ मनुष्यबळ लागणार आहे. याव्दारे २७ लाख ९८ हजार १५४ जणांना लस देण्याचे नियोजन आहे़

चौकट

दोन टप्प्यात लसीकरण

प्रत्येक व्यक्तीला दोनवेळा कोरोना लस घ्यावी लागणार आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची प्रक्रिया प्रत्येकी ४६ म्हणजेच ९२ दिवस चालणार आहे़ सद्यस्थितीला महापालिकेकडे ८ लाख लस साठवण्याची क्षमता असल्याचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

चौकट

जम्बो हॉस्पिटलचा वापर चौथ्या टप्प्यात शक्य

लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात सुमारे २७ ते २८ लाख पुणेकरांना लस दिली जाणार आहे़ यावेळी मुंबईच्या धर्तीवर जम्बो हॉस्पिटलमध्ये या लसीकरणाची व्यवस्था होईल का याचाही विचार केला जात आहे़ जम्बो हॉस्पिटल सध्या बंद करण्यात येत असले तरी, येथील सर्व सुविधा आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत़ त्यामुळे येथे लसीकरण करणे सोपे ठरणार असल्याने या पर्यायाचाही विचार केला जात असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले़