शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ४० लाख झाडे; ८ लाखांनी आणखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:11 IST

राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा गाठला आहे. यातील ४० लाख वृक्षांची १६ ...

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील वृक्षसंख्येने ४८ लाखांचा टप्पा गाठला आहे. यातील ४० लाख वृक्षांची १६ प्रकारांंनी संगणकीय नोंद झाली असून, आणखी ८ लाख वृक्षांच्या नोंदीचे काम सुरू आहे.

सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, येरवडा या उपनगरांमध्ये वृक्षांची संख्या काही लाखांत आहे. कसबा, भवानी पेठ, रास्ता, नाना, तसेच अन्य मध्यभागात ही संख्या काही हजारांमध्ये आहे. शहरातील सर्वाधिक वृक्ष सहकारनगर परिसरात आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १० लाख १५ हजार १४४ ‌वृक्ष आहेत. सर्वांत कमी म्हणजे १२ हजार ४७४ वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने खासगी कंपनीच्या साह्याने वृक्षगणना केली. यात वृक्षाचे प्रचलित नाव, शास्त्रीय नाव, पाने, फुले, फळ, ठिकाण, वय, मालकी अशा १६ मुद्यांची नोंद घेण्यात आली आहे. आणखी ८ लाख वृक्षांची नोंद घेतली जात आहे.

आंबा, वड, पिंपळ, अशा दिवसा जास्त प्राणवायू सोडणाऱ्या देशी वृक्षांची संख्या यात कमी आहे. गिरिपुष्प झाडांची संख्या ९ लाख १९ हजार आहे. कडुलिंबाची झाडे १ लाख ९ हजार ३८५ आहे. आंब्याची झाडे ७३ हजार ८५२ आहेत.

चौकट

देशी वृक्ष व त्यातही वड, पिंपळ अशी आकाराने मोठी व दाट पाने असलेल्या झाडांची लागवड मोठ्या संख्येने करायला हवी. हे वृक्ष जास्त ऑक्सिजन सोडतात. मानवाला हानीकारक कार्बन शोषून घेतात.

डॉ. हेमा साने- वनस्पती तज्ज्ञ

चौकट

“परदेशी झाडांची संख्या काही वर्षांत वाढली असल्याचे निरीक्षण आहे. ‘देशी झाडे लावा, परदेशी वृक्ष लागवड करू नका,’ असे आवाहन वृक्षतज्ज्ञ सातत्याने करत असतात. तरीही दिसण्याच्या आकर्षणापोटी परदेशी वृक्षांची लागवड वाढताना दिसते.

योगेश कुटे, वृक्षगणना करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी