शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नववी, अकरावीचे ३१ लाख २० हजार विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:12 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तसेच नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास ...

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही. तसेच नववीमध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास त्याची पुन्हा परीक्षा घेता येते. परंतु, अनेक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करत असल्याचे दिसून आले आहे. अकरावीला सुद्धा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यावर्षी सर्वच विद्यार्थी थेट दहावी व बारावीत प्रवेश होऊ शकतात.

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यापर्यंत अकरावीचे व प्रवेश सुरू होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अकरावीचा फारचचा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. मात्र, नववीमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासाठी पूरक असणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बारावीत जाण्यापूर्वी विज्ञान व वाणिज्य विषयातील काही संकल्पनांची माहिती होणे आवश्यक असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नसल्या तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

--

राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नववीच्या १७ लाख ९७ हजार ६५५ तर अकरावीच्या १३ लाख २२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातही साधारणपणे एवढ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील तब्बल ३१ लाख २० हजार ४१ विद्यार्थी थेट नववी व अकरावीच्या वर्गात गेले आहेत.

---

राज्यातील प्रमुख शहरांमधील नववी व अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवरी (वर्ष- २०१९-२०२०)

जिल्हा नववी अकरावी

मुंबई १,४०,८७० १,३८,६८७

पुणे १,४६,२२९ १,१६,२७३

नाशिक १,०७,००० ६६,७६९

ठाणे १,२९,८७५ ८६,८२९

औरंगाबाद ७२,०१३ ५४,५४०

नागपूर ६५,३०० ५५,८७६

अहमदनगर ७८,४८५ ६२,८८८

जळगाव ७३,७०३ ४४,४१६