शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:20 IST

Ganesh Festival 2018: भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे.

भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेला भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने सोहळ््याचा वापर करून गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिक एकच गर्दी करतात.छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासून ३०० वर्षांपूर्वी व्यंकोजी फडणीस व चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमीदरम्यान ५ दिवस अष्टविनायक गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी फडणीस अरुणकाका जोशी यांच्या घरून गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीसवाड्यात आणून प्रतिष्ठापना करतात. गणपतीला दररोज एक हजार दुर्वा वाहतात. त्यानंतर दुपारी ११ ते १२.३० दरम्यान जन्मकाळाचे कीर्तन व नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशजन्म सोहळा साजरा केला जातो. त्यानंतर गणेश पुराणवाचन, कीर्तन, प्रवचन झाल्यावर रात्री धूपारती व हरिकीर्तन केले जाते.फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा असून त्यात यमाईदेवीची लाकडी मूर्ती असून गणपतीची एक मूर्ती पितळी व एक तांब्याची आहे. गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी लळिताचे कीर्तन असून त्याचा प्रसाद रात्री दिला जातो.अशा पद्धतीने गणेश जन्मोत्सवसंपूर्ण राज्यात भोर येथील फडणीसवाड्यात फडणीस व शनिवारवाड्यात पेशवे आणि मुजुमदारवाड्यात मुजुमदार मागील ३०० वर्षांपासून अखंडपणे साजरे केले जात असल्याचे प्रमोद फडणीसयांनी सांगितले.शिवाजीमहाराजांच्या काळात विचित्रगड संस्थानात कोषागार होते. त्याचे कार्यक्षेत्र महाबळेश्वरपासून ते सुधागड, पालीपर्यंत कारभार होता. त्याचा सारा वसूल करण्याचे काम फडणीसांचे वंशज शिवाजीमहाराजांकडे करीत होते. त्यांचे पूर्वीचे नाव लोहकरे होते. मात्र महाराजांनी त्यांना फडणीस ही पदवी दिल्याने तेव्हापासून त्यांना फडणीस म्हणून ओळखू लागले. भोरचे राजे पंतसचिव पूर्वी आंबवडेगावात व फडणीस चिखलावडेगावात राहतहोते. पंतसचिवांबोबर फडणीसहीभोरला राहायला आले. मात्र चिखलावडे गावात आजही त्यांचे गणेश मंदिर आहे. भोर येथील फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सवाला वेल्हे कोषागारातून २७ रुपये अनुदान मिळत होते, तर रोषणाईचे साहित्य भोरचे राजे पतंसचिव देत असत आणि पंतसचिव सर्व लवाजम्यासह गणेशजन्मकाळाच्याकीर्तनाला स्वत: हजेरी लावत असत, मात्र संस्थाने खालसा झाली आणि पुढे ही परंपरा बंद झाली असली तरी मागील ३०० वर्षे अखंडपणे फडणीसवाड्यात व्यंकटेश रामचंद्र फडणीस,त्यांचे पुतणे प्रमोद फडणीस ही दोन कुटुंबे सर्व खर्च करून आपली परंपरा आजही कायमठेवली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Famous Ganpati Pandalप्रसिद्ध गणपती मंडळ