शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित डीपीमध्ये पीएमपीसाठी २५ जागा

By admin | Updated: September 30, 2015 01:39 IST

शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) पीएमपीसाठी अच्छे दिन आले आहेत. हा डीपी तयार करण्यासाठी राज्यशासनाने नेमलेल्या

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) पीएमपीसाठी अच्छे दिन आले आहेत. हा डीपी तयार करण्यासाठी राज्यशासनाने नेमलेल्या समितीने पीएमपीसाठी तब्बल २५ ठिकाणी आरक्षणे ठेवली आहेत. १९८७च्या विकास आराखड्यात ही आरक्षणांची संख्या १९ होती तर महापालिकेने याच वर्षी मार्च महिन्यात सादर केलेल्या आराखड्यातही ही संख्या तेवढीच होती. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि इतर दळणवळणांच्या साधनांच्या ठिकाणी पीएमपीची आवश्यक असलेली कनेक्टिव्हीटी ही बाब लक्षात घेऊन ही आरक्षणे वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तब्ब्बल ३ हजार वाहने आणि १६ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १२ लाख प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीला गाड्या पार्क करणे, नवीन डेपो विकसित करणे, नव्या सुविधा देणे यासाठी शहरात तब्बल १५५ एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, दोन्ही शहरांमध्ये मिळून पीएमपीकडे अवघी ४६ एकर जागा आहे. त्यामुळे पीएमपीच्या हजारो बस रात्री रस्त्यावर उभ्या असतात, तर शहरात प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन डेपोही सुरू करणे पीएमपीला शक्य नाही. त्यामुळे पीएमपीकडून महापालिकेकडे वारंवार जागेची मागणी केली जाते. ही बाब लक्षात घेऊन १९८७च्या शहर विकास आराखड्यात पीएमपीसाठी तब्बल १९ जागा अरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच महापालिकेने प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या सुधारित डीपीमध्येही या आरक्षणातील काही ठिकाणांचे जागा बदल करण्यात आले होते. मात्र, आरक्षणांची संख्या कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये हा डीपी राज्य शासनाने ताब्यात घेऊन तो अंतिम करण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीसही पीएमपीकडून जागांच्या आरक्षणाबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेत समितीने पीएमपीसाठीच्या आरक्षणांची संख्या ६ने वाढवून ती आता २५ केली आहे. त्यामुळे भविष्यात पीएमपीची जागेची समस्या काही प्रमाणात सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)