पुणो : शहराला पाणीपुरवठा करताना टँकरचे दर परवडत नाहीत. त्यामुळे टँकरला जीपीएस बसविण्याचा खर्च परवडत नसल्याचा गवगवा खासगी टँकर ठेकेदारांकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठेकेदारांना पुणोकरांनी गेल्या अडीच वर्षात तब्बल 22 ते 24 कोटी रुपये मोजले असल्याचा अंदाज आहे.
एप्रिल 2क्12 ते 17 जुलै 2क्14 अखेर शहरात तब्बल 3 लाख 51 हजार 218 टँकर फे:या झाल्या आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 89 हजार 895 या खासगी ठेकेदारांच्या फे:या आहेत तर 1 लाख 61 हजार महापालिकेच्या टँकरच्या फे:या आहेत. महापालिकेचे टँकर मोफत देण्यात आले असले, तर खासगी ठेकेदारांनी ते किती रुपयांना विकावे याचे दर 9क्क् रुपयांपासून 15क्क् रुपयांर्पयत पालिकेने ठरवून दिले आहेत. हे दर पाहता पुणोकरांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हक्काचे पाणी विकत घ्यावे लागले आहे.
सन 2क्11-12 मध्ये कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणामध्ये 7क् टक्केच पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात एक वेळ पाणीकपातीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. एप्रिल 2क्12 पासून ही पाणीकपात सुरू होती, ती ऑक्टोबर 2क्13 र्पयत होती. त्यानंतर शहरातील अनेक भागांत पाणीच पोहचत नसल्याने नागरिकांना महापालिका तसेच खासगी टँकरचा आधार घ्यावा लागला. हे टँकर शहराला दोन वेळ पाणीपुरवठा सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अद्याप तेवढय़ाच प्रमाणात सुरू आहेत.
4गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण घटल्याने तसेच हद्दीजवळ मोठय़ा प्रमाणात शहराचा विस्तार झाल्याने पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा बिघडली आहे. त्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा करण्यास प्रशासनास अडचणी येत आहेत. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पुणोकरांवर एक वेळ पाणीकपात ओढावली आहे. परिणामी अजून अनेक दिवस तरी पुणोकरांना पाऊस चांगला पडावा, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.
हमीपत्र देण्यास नकार
4महापालिकेकडून टँकरधारकांना पास देण्यापूर्वी त्यांनी जादा दराने पाणी विकले अथवा काही गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर कारवाई करता यावी म्हणून अनामत रकमेसह हमीपत्र भरून देण्याचा आग्रह महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, टँकरलॉबीकडून त्यास नकार दिला जात आहे. हे हमीपत्र लिहून दिल्यास त्यांना टँकर हद्दीबाहेर देणो अथवा जादा दराने दिल्याची तक्रार केल्यास कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेस असणार आहे. मात्र, पालिकेचे नियंत्रण नको असल्याने या हमीपत्रला नकार दिला जात आहे.
दर तपासणीची नाही यंत्रणा
4महापालिकेने खासगी ठेकेदारांना शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे दर ठरवून दिले असले तरी, त्याच दराने पैसे आकारले जातात का, याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडून उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिकेकडून ठेकेदारांना स्वस्त दरात पाणी मिळत असले तरी, प्रत्यक्षात नागरिकांना किती रुपयांत टँकर विकला जातो याची काहीच पाहणी होत नाही. त्यामुळे टँकरधारकांकडून मनमानीमुळे नडलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली असल्याचे शहरातील प्रत्यक्षातील चित्र आहे. मात्र, टँकरची गरज वारंवार भासत असल्याने पाण्याविना खोळंबा नको म्हणून नागरिकही या टँकरधारकांच्या मनमानीविरोधात तक्रार करीत नसल्याचे महापालिकेचे अधिकारीच सांगतात.