शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला २४ कोटींचा दंड

By admin | Updated: March 31, 2017 03:01 IST

घरकुल प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या जागेचा ठरावीक कालावधीत वापर न केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला

पिंपरी : घरकुल प्रकल्प उभारण्यासाठी दिलेल्या जागेचा ठरावीक कालावधीत वापर न केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला नवनगर विकास प्राधिकरणाने २४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड माफ करण्यात यावा, अशी महापालिका प्रशासनाने विनंती केली आहे. मात्र, दंड माफ करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे सांगत पिंपरी प्राधिकरणाने हा चेंडू राज्याच्या नगरविकास खात्याकडे टोलविला आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वस्तात घरे देण्याची महत्त्वाकांक्षी योजना २००७ मध्ये महापालिकेने जाहीर केली. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखलीमधील पेठ क्रमांक १७ व १९ मधील २३ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. या आरक्षण बदलावरून त्या वेळी वादही झाला. २००९-१० मध्ये प्रत्यक्षात या जागेचा ताबा पालिकेला मिळाला. प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार जागा हस्तांतरण केल्यापासून तीन वर्षांच्या आत सदर जागेचा वापर सुरू करणे आवश्यक असते. जागा वापराची प्रक्रिया सुरू न झाल्यास पहिल्या वर्षाला ५ व दुसऱ्या वर्षाला १० टक्के दंड आकारला जातो. तिथून पुढे दंडाची रक्कम चार ते दहापट वाढत जाते. पालिकेचे ढिम्म प्रशासन आणि योजनेला आलेले अडथळे यांमुळे ही योजना ठरलेल्या कालावधीत सुरू झाली नाही. त्यामुळे दंडाची रक्कम २४ कोंटींवर पोहोचली.(प्रतिनिधी)घरकुल : बांधकाम परवान्यास अडचणी प्रकल्पाचे कालांतराने बांधकाम सुरु झाले. मात्र दंडाची रक्कम महापालिकेने भरली नसल्याने इमारत पूर्णत्वाचे दाखले प्रधिकरणाने दिले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर मोर्चे-आंदोलने झाल्यावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दबावतंत्र वापरुन हे दाखले देण्यास भाग पाडले. मात्र आता सुधारित बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्यास प्राधिकरणाने साफ नकार दिला आहे. दंडाच्या रकमेचा जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत हे दाखले दिले जाणार नाहीत, अशी भूमिका प्राधिकरणाने घेतली आहे. दंडाची रक्कम समायोजित करण्यात यावी किंवा माफ करण्यात यावी, यासाठी पालिकेने प्राधिकरणाकडे पाठपुरावा के ला. मात्र हा प्राधिकरणाला अधिकार नसल्याचे सांगत ४ फेब्रुवारी २०१७ रोजी नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांकडे याबाबत मार्गदर्शन मागितले. मात्र अद्यापपर्यंत सचिवांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे पालिकेची उर्वरित बांधकामे करण्यासाठी बांधकाम परवाना परवाना मिळण्यास अडचणी येत आहेत.