शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

नागरी सदस्यपदासाठी २१ अर्ज

By admin | Updated: June 19, 2014 05:31 IST

बोर्डाचे अध्यक्ष यातील तीन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे दोन दिवसांत करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

किवळे : कॅन्टोन्मेंट कायद्यानुसार बोर्डाचा कारभार पाहण्यासाठी केंद्र सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय समितीतील एका नागरी सदस्याच्या नियुक्तीसाठी देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाकडे सहा माजी उपाध्यक्ष, दोन निवृत्त अधिकारी, तसेच शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकूण २१ इच्छुकांनी अर्जाद्वारे माहिती सादर केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष यातील तीन नावांची शिफारस केंद्र सरकारकडे दोन दिवसांत करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाने कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांची दुसऱ्यांदा वाढवलेली सहा महिन्यांची मुदत ५ जूनला संपल्याने देशातील ५८ पैकी ५५ बोर्ड एका वर्षासाठी बरखास्त करण्याचा निर्णय देहूरोड बोर्ड प्रशासनाला ४ जूनला कळविण्यात आला होता. त्यानंतर रक्षा संपदा विभागाच्या संचालकांनी बोर्डाला १२ जूनला पाठविलेल्या पत्रानुसार सरकारनियुक्त नागरी सदस्यपदासाठी बोर्डाच्या हद्दीतील इच्छुक नागरिकांकडून त्यांची संपूर्ण माहिती १८ जूनअखेर मागविली होती. त्यानुसार बोर्डाकडे ७ वॉर्डांतील २१ इच्छुकांनी संपूर्ण माहिती बोर्डाकडे सादर केली आहे.बोर्ड कार्यालयामार्फत सर्व इच्छुकांची यादी व माहिती बोर्डाच्या अध्यक्षांकडे पाठविण्यात येईल. २ दिवसांत अध्यक्ष यातील ३ नावांची शिफारस केंद्र सरकारकडे करणार आहेत. (वार्ताहर)