शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून २० किलो चांदीची लूट

By admin | Updated: May 22, 2014 05:44 IST

चाकूचा धाक दाखवून कामगारांचे हातपाय कापडाने बांधून २० किलो चांदी व दोन मोबाईल, असा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला

आळंदी : चºहोली खुर्द (ता. खेड) येथील फिनिक्स इंटरप्रायझेस या कंपनीतील कामगारांना चाकूचा धाक दाखवून कामगारांचे हातपाय कापडाने बांधून २० किलो चांदी व दोन मोबाईल, असा नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपनीत काम करणार्‍या कामगारांना चार महिन्यांपूर्वी कामावरून कमी केले होते. उत्तर प्रदेशातील चार कामगारांनी ही चोरी केली असून, सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी नवल रजपूत, महेश रजपूत, वीरेंद्र रजपूत, विध्वंस रजपूत (सर्व रा. हमीदपूर, उत्तर प्रदेश) या चार जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व जण फरार आहेत. सुरेश सेन, दवकरन वर्मा, ग्यादीत वर्मा हे रात्रीच्या वेळी कंपनीत काम करीत असताना यातील आरोपी यांनी कंपनीत पाठीमागील बाजूने प्रवेश करून कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय बांधले. कंपनीतील लोखंडी पेटीचा कोयंडा हेक्सा ब्लेडने कापून त्यातील २० किलो चांदी व दोन मोबाईल असा माल दरोडा घालून चोरून नेला. सध्या कंपनीत कामाला असलेले तीन कामगार आणि चोरी करणारे आरोपी हे एकाच गावचे आहेत. त्यांच्या तपासासाठी पुणे रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी पोलीस पथके पाठविली असून, घटनास्थळाला जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी भेट दिली व तपासकामाबाबत सूचना, मार्गदर्शन केले. पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. कुमार कदम हे करीत आहेत. (वार्ताहर)