लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : नीरा डाव्या कालव्यात शेंडकरवाडी (ता. बारामती) येथे स्थानिक मच्छीमारांना २० किलो वजनाचा मासा आज (दि. २९) सापडला आहे.दोनच दिवसांपूर्वी नीरा डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्याने शेंडकरवाडी येथील मोठ्या पाण्याच्या डोहात वीस किलोचा मासा सापडल्याने स्थानिक नागरिकांनी मासा पाहायला एकच गर्दी केली होती. एवढ्या मोठ्या वजनाचा मासा नीरा कालव्यात सापडल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. नीरा नदीतही एवढा मासा सहसा दिसत नाही. वीर धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे कालव्याला सोडलेल्या पाण्यातून खाली येत आहेत. त्यामुळे हा मासा सापडला आहे. कटला जातीचा हा मासा स्थानिक मच्छीमार दादा पाटोळे, बापू कोळपे, गणेश बामणे, तानाजी जाधव यांनी हाताने पकडून नीरा येथील बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला.
नीरा डावा कालव्यात २० किलोचा मासा
By admin | Updated: May 31, 2017 01:51 IST