शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १५९ गावे हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे/ लोणीकाळभोर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नियमावलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे/ लोणीकाळभोर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने नियमावलीत बदल करत रुग्णसंख्या वाढत असलेली १५९ गावे हायअलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली १०६ गावे अलर्ट गावे म्हणून घोषित केली आहे. यात जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचाही समावेश करण्यात आला आहे. हाय अलर्ट व अलर्ट गावांत कोरोना व्यवस्थापनाची जबाबदारी ही उपविभागीय अधिकारी, तसेच घटना व्यवस्थापकांवर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. यासाेबतच या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त गावातून बाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेक गावे जिल्हा परिषदेेमार्फत हॉटस्पॉट क्षेत्र आणि प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी उपाय योजना करूनही संख्या आटोक्यात येत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत कठोर उपाय योजना करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्वेक्षण केले असता, ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत या ठिकाणची रुग्णसंख्या वाढत आहेत अशी गावे हाय अलर्ट व ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत याठिकाणची रुग्णसंख्या कमी होत नाही ती अलर्ट गावे म्हणून घोषित करणे क्रमप्राप्त ठरल्याने त्यानुषंगाने संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५९ गावे ही हाय अलर्ट, तर १०६ गावे ही अलर्ट म्हणूज जाहीर करण्यात आली आहे.

या सर्व गावांना तालुकास्तरीय अधिकारी यांनी भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावस्तरीय समित्या कार्यान्वित कराव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे. याचबरोबर पोलीस प्रशासनाने वरील ग्रामपंचायत क्षेत्रात पाळत वाढवावी जेणेकरून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. तर आरोग्य विभागाने या सर्व गावांमध्ये लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल याप्रमाणे नियोजन करावे. जेणेकरून कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे शक्य होईल, असे आदेश देण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

चौकट

...तर होणार फौजदारी कारवाई

हाय अलर्ट व अलर्ट गावांतील नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त बाहेर पडू नये, आरोग्यविषयक कामकाज असेल तरच शक्यतो बाहेर पडावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात कुटुंबासमवेत असतानाही मास्कचा वापर करावा. याचबरोबर सहव्याधी असणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक बाबींसाठी बाहेर पडल्यानंतर सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

कोट

जिल्ह्यात अनेक गावात ही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला असला, तरी बाधितांचा आकडा कमी होत नसल्याने हा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका नगरपरिषद तसेच नगर पंचायत परिसरात कोरोनाबाधित वाढत आहेत, अशी गावे हाय अलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली गावे अलर्ट म्हणून घोषित केले असून या ठिकाणी नियमावलींचे कठोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

चौकट

सर्व नगरपरिषदा हाय अलर्टमध्ये

जिल्ह्यात १३ नगरपालिका आणि ३ नगरपंचायती आहेत. या सर्व नगरपंचायतीतील रुग्णसंख्या ही अजूनही वाढतीच असल्याने त्यांचा समावेश हा हाय अलर्टमध्ये करण्यात आला आहे.

तालुकानिहाय हाय अलर्ट आणि अलर्ट गावे

तालुका हाय अलर्ट गावे अलर्ट गावे

आंबेगाव १० १३

बारामती १३ १५

भोर ७ ५

दौंड १० ७

हवेली २० ७

इंदापुर ११ २२

जुन्नर १४ ५

खेड १९ ७

मावळ ८ ५

मुळशी १४ १

पुरंदर ११ १०

शिरूर २१ ७

वेल्हे १ ३

एकूण १५९ १०६