शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसात १५८ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने जोरदार फटकेबाजी करत तब्बल १५८ विविध विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. या सर्वसाधारण सभेत ३४६ विविध प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले होते.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी आणि बुधवारी झाली. दोन दिवसांच्या या सर्वसाधारण सभेत सात कार्यपत्रिकांवर चर्चा झाली. यामध्ये १५८ विषय मान्य करण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे दीड ते पावणे दोन वर्षांपासून अनेक गोष्टींवर बंधने आली. महापालिकेच्या कामकाजावरदेखील याचा परिणाम झाला. पालिकेच्या सर्वसाधारण सभांना याचा फटका बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडले होते. त्यामुळे विकासाची कामे खोळंबली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर महानगरपालिकेला ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार कोरोनाच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून हे कामकाज करण्यात आले. सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून सभागृहात हे विषय मांडून त्यावर आवश्यक चर्चा करत सभासदांच्या शंकांचे समाधान करत हे प्रस्ताव मांडून मान्य करण्यात आले, असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या सभासदांबरोबर विरोधी पक्षाच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यापुढील काळातदेखील शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे प्रस्ताव सर्वानुमते मांडून एकमताने मान्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहणार असल्याचे बिडकर यांनी आवर्जून सांगितले.

-------

या प्रस्तावांना देण्यात आली मंजुरी...

- स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्ग खर्च

- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अंशतः बदल

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल संरचना बदल खर्च

- समाविष्ट अकरा गावे डीपी सहा महिने मुदतवाढ

- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या सेवकांसह रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार अधिकाधिक मदत देणे.

- शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ७२ ब नुसार निधी उपलब्ध करून देणे.

--------