शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक करदात्यांना मिळकतकरात १५ टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्या पुणेकरांनी लॉकडाऊनमध्ये मिळकतकर नियमित भरला असेल, त्यांच्यासाठी खूशखबर आहे. महापालिकेने या पुणेकरांसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्या पुणेकरांनी लॉकडाऊनमध्ये मिळकतकर नियमित भरला असेल, त्यांच्यासाठी खूशखबर आहे. महापालिकेने या पुणेकरांसाठी निवासी मिळकतकरात १५ टक्के सवलत दिली आहे.

महापालिकेने सन २०२१-२२ च्या वर्षासाठी निवासी मिळकतकरात सरसकट १५ टक्के सवलत देऊ केली आहे़ १ एप्रिल, २०२१ ते ११ मे,२०२१ या दोन महिन्यांत मिळकतकर भरणाऱ्यांनाच ही कर सवलत लागू राहणार आहे़ महापालिका आयुक्तांनी आगामी वर्षाकरिता सुचविलेली ११ टक्के मिळकतकर करवाढ फेटाळतानाच, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे निवासी मिळकतकरात सवलत देत पुणेकरांना खूश केले आहे़ बड्या मिळकतकर थकबाकीधारकांसाठी अभय योजना राबवून त्यांना विविध सवलती दिल्या होत्या. तेव्हा प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्यांवर हा अन्याय असे बोलले जात हाेते. पण आता त्या नागरिकांना महापालिकेने सवलत देऊन आनंदी केली आहे.