फुलपाखरे ही मुख्यत: कोवळं ऊन आणि स्वच्छ हवेत वाढतात आणि त्यांना अति पाऊस, अति थंडी, अति उकाडा आणि वाढते प्रदूषण सहन होत नाही. वातावरणाच्या बदलाचे निर्देशक म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे पाहता येते. काही फुलपाखरे झाडाचा चिक, शेण आणि कुजणारी फळेदेखील खातात. बऱ्याचदा आपल्याला फुलपाखरे ही अनेक संख्येनी एकत्र येऊन ओलसर मातीत बसलेली दिसतात. तेव्हा ती मातीतील सोडियम, पोटॅशियमसारखे क्षार शोषत असतात. फुलपाखराची अळी ही अनेक पक्ष्यांकरिता त्यांच्या विणीच्या हंगामात प्रथिनांच्या मुख्य स्रोत असते. म्हणजे जर एखादी फुलपाखराची प्रजात पूर्णतः नामशेष झाली तर त्याचा परिणाम त्या फुलपाखराशी निगडित असलेल्या झाडांवर आणि पशुपक्ष्यांवरसुद्धा होणार आहे.
----------------------------- भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू – ‘ऑरेंज ओक लीफ’ किंवा ‘डेड लीफ’
- जगातील सर्वांत मोठं फुलपाखरू हे 'Queen Alexandra's Birdwing' असून, पंख विस्तार २५-२८ सेंमी. हे फुलपाखरू नष्टप्राय व अति-दुर्मीळ असून, ते ‘पापुआ न्यू गिनी’ या देशात आढळून येते.
- भारतातील सर्वांत मोठं फुलपाखरू हे ‘गोल्डन बर्डविंग’ असून, त्याच्या पंखांचा विस्तार १९.४ सेंमी आहे.
- महाराष्ट्रातील सर्वांत मोठे फुलपाखरू (सह्याद्री बर्ड विंग किंवा सदर्न बर्ड विंग) हे आपल्याला पश्चिम घाटातच आढळून येते व त्याचा पंख विस्तार १९ सेंमी इतका आहे. Blue Mormon किंवा नीलपंखी हे महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे.
- ‘वेस्टर्न पिग्मी ब्लू’ हे जगातील सर्वांत लहान आकाराचे असून, त्याचा पंख विस्तार फक्त १.३ सेंमी इतका आहे.
सर्वांत सुप्रसिद्ध, अतिशय मोहक दिसणारे आणि लांब स्थलांतर करणारे फुलपाखरू म्हणजे ‘मोनार्क’ फुलपाखरू. ही फुलपाखरे स्थलांतर करताना नॉर्थ अमेरिकेपासून सेंट्रल मेक्सिकोपर्यंत २००० मैलांचा प्रवास करतात. एका दिवसात या फुलपाखराने जास्तीत जास्त २६५ मैल प्रवास केल्याची नोंद आहे.
-----------------------------अतिशय वेगात उडणारे फुलपाखरू म्हणजे स्किपर्स.
‘पेंटेड लेडी’ हे जगातलं सर्वांत शक्तिशाली फुलपाखरू म्हणून ओळखले जाते.
‘Glass winged butterfly’ या फुलपाखराचे पंख त्याच्या नावाप्रमाणे काचेसारखे पारदर्शक असतात.
एका फुलपाखराच्या पंखावर 88 हा आकडा दिसतो म्हणून त्याचे नाव ‘88 बटरफ्लाय’ असे मजेशीर आहे.