शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा महामार्गावर १२ तास कोंडी

By admin | Updated: November 23, 2015 00:51 IST

केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला. यामुळे बारा तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

नसरापूर : केळवडे येथे पहाटेच्या सुमारास गॅसची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या अपुऱ्या कामालगत पुणे-सातारा महामार्गावर पलटी झाला. यामुळे बारा तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आज रविवारी पहाटे सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारा टँकर (एमएच ०६ के ५७१५) हा सातारा महामार्गावरील केळवडे येथील रोहित हॉटेलजवळील रस्त्यालगत पलटी झाला. रस्त्यावर जोरात पडल्याने या अपघातग्रस्त टँकरमधून वायू गळती सुरू झाली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी महामार्गाच्या दोन्ही बाजुस वाहतूक थांबवून सातारा बाजुकडून येणाऱ्या वाहनांची वाहतूक कापूरहोळमार्गे सासवड वळविली. तर खेड-शिवापूर टोलनाक्यावरच वाहनांची वाहतूक थांबविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. सुमारे १० किमीपर्यंत ट्रॅफिक जॅम झाल्याने पोलिसांची दमछाक होत होती. सकाळी अग्नीशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तर या अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरताना वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यावेळी गळती थांबविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बघ्याच्या गर्दीमुळे पोलिसांना कामात अडथळा येत होता. या अपघातामुळे मात्र प्रवाशांचे खूपच हाल झाले. कामाला जाणारे अनेक कामगार या अपघातामुळे कामाला जाऊ शकले नाहीत. महामार्गाला पर्यायी असणाऱ्या रस्त्यावरून पोलीस व जाणकारांच्या मदतीने वाहतूक वळवळी गेली. या वाहतूक कोंडीवेळी अनेक अतिउत्साही प्रवाशी आपापली वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.