शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर तालुक्यातील १0८ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 01:44 IST

जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १0८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकूण १0८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ३९ उमेदवार, तर पंचायत समितीसाठी १४ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तबबल ५३ उमेदवारांची माघार झाली.पंचायत समितीच्या ३१ उमेदवारांनी माघार घेतली, तर जिल्हा परिषदेच्या २२ उमेदवारांनी माघार घेतली, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. तर, काहींनी थेट पक्षांतर करून दुसऱ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होत. त्यामुळे बंडखोर उमेदवारांच्या माघारीकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सर्वच पक्षात कमी-अधिक प्रमाणात नाराजीनाट्य दिसून आले. तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी बेल्हे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वल्लभ शेळके यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दाखल केलेला अपक्ष उमेदवार अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या पुढील आवाहन वाढले आहे. निरगुडे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोपट रावते, केशव वायाळ, हरिभाऊ नवले,युवराज लांडे, मारुती वारे यांनी पाडळी गणातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच, अतुल आहेर,अजित बांगर यांनीदेखील माघार घेतली आहे. निरगुडे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोहिदास नवले यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच, निरगुडे गणातील शिवसेनेचे कार्यकर्ते सचिन चव्हाण यांनी शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने दाखल केलेली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या गणातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप गांजाळे यांची डोकेदुखी वाढली आहे.(वार्ताहर)