शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी करणाऱ्याविरुद्ध १०० कोटींचा दावा लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काही जण आपल्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागत असून ‘पैसे दिले नाही तर, तुमचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काही जण आपल्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागत असून ‘पैसे दिले नाही तर, तुमचा आसाराम बापू करू’, अशी धमकी मला धमकी दिली जात आहे. माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात असून मी त्याचे खंडण करतो. माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध १०० कोटींचा दावा लावणार असल्याचे मनोहर चंद्रकांत भाेसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात आहे. त्याबाबत भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले. यावेळी ॲड. रूपाली ठोंबरे पाटील आणि ॲड. विजय ठोंबरे उपस्थित होते.

मनोहर भोसले यांनी सांगितले की, ना मी कोणताही अवतार आहे. ना कोणता बाबा, ना कोणता महाराज, मी केवळ श्री बाळूमामांचा निस्सिम भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेतून मी बाळूमामांचे मंदिर उभारले आहे. लोक दर्शनासाठी येत असतात. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला असून अनेक लोकांना धार्मिक सल्ले व पारायण करण्याचा सल्ला देत असतो. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्या लावण्याच्या पार्किंगवरून काही स्थानिक लोकांच्या मनामध्ये राग आहे. त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो, असेही माझ्यावर आरोप होत आहेत. मी कोणत्याही व्यक्तीस एकही रुपयाचीही मागणी केली नाही. तेथे आलेले भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिवसिद्धी संचालित श्री मामा संस्था या संस्थेकडे देणगी देतात, ही देणगी केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते, असे त्यांनी सांगितले.

बाळूमामा यांच्यावरील मालिकेबाबत त्यांनी सांगितले की, बाळूमामाचे कार्य घराघरात जावे, या हेतूने या मालिकेसाठी कथा पुरविली आहे. त्याच्या नोंदणीसाठी ‘मनोहर मामा हाय लँड एलएलपी’ ही कंपनी स्थापन केली आहे. त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. आता मालिकेच्या सुरुवातीला दाखविला जाणारा माझा फोटो काढायचा की ठेवायचा हा निर्मात्याचा प्रश्न आहे. उंदरगावच्या मठात रितसर मीटर घेऊन वीज घेतली आहे. ‘सोलर प्लॅंट’द्वारे येथे वीजेचा वापर केला जातो. आमची ही धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी मला व भक्तांना खंडणीही मागितली आहे. मी त्यांना खंडणी न दिल्यास ते माझ्यावर व भक्तांवर खोटेनाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने मी करमाळा पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. बारामती येथे गुन्हा दाखल करणारा माझा भक्त आहे. त्याने २०१५ च्या घटनेचा आता कोणाच्या सांगण्यावरून तक्रार केली आहे. इतके वर्ष तो का गप्प होता, असे मनोहर भोसले यांनी सांगितले.