कोलकाता : १६ व्या लोकसभेत तृणमूल काँग्रसचे जे खासदार निवडून आले त्यामध्ये ३५ टक्के महिला आहेत. त्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अभिमानाने उल्लेख केला.संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले नसतानाही आमच्या पक्षाने महिलांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिले आहे असेही त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त केलेल्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण याआधीच दिले आहे.
तृणमूलच्या महिला खासदार सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:50 IST