शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंसाठी पक्षांमध्ये रस्सीखेच, इतर पर्यायांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:49 IST

सातारा हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

- दीपक शिंदेसातारा हा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत खासदारांनी पक्षाच्या वाढीसाठी कोणतेच काम केले नसल्याचा आरोप पक्षाच्याच आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय व्हायचा आहे.कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी निवडून येण्याच्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि त्याविरोधात असलेल्या गटांच्याही त्यांनीभेटी घेतल्या आहेत. पक्ष कोणताही असला तरी उदयनराजे निवडून येणार असा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास असल्यामुळे भाजपह, आरपीआय यांनी उदयनराजेंनी आपल्या पक्षात यावे यासाठी पायघड्या घातल्या आहेत. मात्र, जोपर्यंत शरद पवार अंतिम निर्णय देणार नाहीत तोपर्यंत उदयनराजेही कोणत्या पक्षात जायचे याबाबतचा अंतिम निर्णय फायनल घेणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना उमेदवारी दिली नाही तर त्या पक्षाकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे असे तीन पर्याय तयार आहेत.२००९ साली शिवसेनेने पुरूषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, २०१४ मध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला गेल्यामुळे पुरूषोत्तम जाधव यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तर आरपीआयने अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. यावेळीही पुरूषोत्तम जाधव लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अपक्ष लढणार की पक्षाच्या तिकिटावर हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्याबरोबरच भाजपकडून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून यावेळी स्वातंत्र्यसैनिक किसन वीर यांचे नातू शैलेंद्र वीर यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर भाजप, शिवसेना, आरपीआय यांच्या युतीमध्ये हा मतदारसंघ आरपीआयच्या वाट्याला आला आहे. मात्र, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर हा मतदारसंघ भाजप स्वत:साठी मागू शकते. या मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ येतात.>सध्याची परिस्थितीपक्षाच्या उमेदवारीसाठी उमेदवारांमध्ये वाद असे राज्यात चित्र असताना साताऱ्यात मात्र, उमेदवारासाठी पक्षांमध्ये चढाओढ आहे. समझोता करण्याची स्थिती. सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेना, भाजप आणि आरपीआय हे तिन्ही पक्ष आपलाच मतदारसंघ म्हणून दावा करीत आहेत. काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले यांचे पुत्र मदन भोसले यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते भाजपमध्ये आले तर लोकसभेची रंगत आणखी वाढणार आहे.राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना उमेदवारी मिळाली तर आमदारांचे सहकार्य मिळणार का आणि नंतर उदयनराजेंची मदत होणार का हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९