शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हरित मार्गासाठी युवकांचा पुढाकार

By admin | Updated: June 26, 2017 03:33 IST

देहू-पंढरपूर हरीत मार्गासाठी बारामतीच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. विठ्ठलभेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांबरोबर

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : देहू-पंढरपूर हरीत मार्गासाठी बारामतीच्या युवकांनी पुढाकार घेतला आहे. विठ्ठलभेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांबरोबर पर्यावरणाची आस असलेल्या युवकांनी एकत्रित येउन निसर्गसंवर्धनासाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. विठोबाच्या भेटीसाठी वारीत निघालेल्या वारकऱ्यांचे देहभान हरपते, त्याप्रमाणे हे युवक पर्यावरणाच्या ध्यासातून पायी चालून हा उपक्रम राबवित आहेत. या युवकांची पर्यावरणवारी परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.बारामती येथील नेचर फें्रड्स आर्गनायझेशनच्या युवकांनी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना सीडबॉलसह बिया वाटपाचा उपक्रम राबविला. या वेळी १० हजारांहून अधिक सीडबॉल, तर ८ लाख बियांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणसंवर्धनामध्ये वृक्षसंवर्धनाचे वाढते महत्त्व पाहून युवकांनी हा उपक्रम राबविला. देशी झाडांचे संवर्धन पशुपक्ष्यांसाठी अधिक उपयुक्त आहे. या पार्श्वभूमीवर युवकांनी करंज, अर्जुन, शेवगा, कडुनिंब, चिंच, जांभूळ, हादगा, शेवगा आदी झाडांच्या बिया, सीडबॉलवाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी युवकांनी गेल्या ६ महिन्यांपासून पूर्वतयारी केली होती. शहरातील ५ विद्यालयांमधील शालेय विद्यार्थ्यांना बियासंकलनासाठी सहभागी करण्यात आले होते. बियासंकलनासाठी सीड बँकेचादेखील उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला. त्यामुळे लाखाच्या संख्येत बियासंकलन करणे शक्य झाले. यंदा उंडवडीपासून काटेवाडीपर्यंत सीडबॉल, बियावाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी युवकांनी थेट दिंंड्यांशी संवाद साधला. या उपक्रमाचे महत्त्व पटवून दिले. बीजारोपणासाठी लाखो हात एकत्र आल्यास देहू-पंढरपूर हरित मार्ग बनण्यास मदत होईल, असे युवकांनी वारकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.कांबळे यांच्यासह सचिन जानराव, श्रीकांत पवार, कार्तिक शहा, अक्षय गांधी, पारस मेहता, सोमेश बांदल, कुणाल टिळेकर, आनंद सोनवणे, सचिन गायकवाड, चिकू सरोदे, अक्षय बिरदवडे, किरण कर्वे, सुमित गांधी, सोनाली क्षीरसागर या युवकांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला.