शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

महापालिकेच्या रोपवाटिका बंद पडणार?

By admin | Updated: July 8, 2015 02:09 IST

निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे.

निगडी सेक्टर २७ येथील रोपवाटिकांच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रोपवाटिकेत २५ हजार रोपे सध्या आहेत. त्या रोपाना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. उद्यान विभागाच्या गुलाबपुष्प रोपवाटिकेतही फक्त शहरातील सुशोभीकरणासाठी असलेली झाडेच शिल्लक आहेत. या ठिकाणाहून विक्री केली जात नाही. काही रोपे आजतागायत विक्रीसाठी व सुशोभीकरणासाठी ठेकेदारांकडूनच मागविली जात आहेत. ती रोपे महापालिका उद्यान विभाग तयार करण्याचे धैर्यच दाखवीत नाही. रोपांसाठी लागणारी खते, कीटकनाशके व मातीचा कस यांमध्ये संदिग्धता निर्माण होत आहे. रोपवाटिकेतच गांडूळ खत व कंपोस्ट खत रोपांसाठी तयार केले जाते. रोपांसाठी लागणारी पोयटा माती ही टेंडर पद्धतीने मागविली जाते. निगडीतील रोपवाटिकेत उद्यान सहायक हे पद सध्या रिक्त आहे. तसेच, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोपे विक्रेता, सहायक, वाहनचालक, सफाई कामगार, स्त्री मजूर, माळी, प्लंबर, मजूर ही पदे सध्या आहेत. मात्र, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा येत आहे. अ प्रभागासाठी २५ कर्मचारी सध्या आहेत. महापालिकेत उद्यान कामासाठी वाहनांची कमतरता भासत आहे. वाहनचालकांची संख्या अपुरी आहे. तीन प्रभाग मिळून एक वाहनचालक आहे. रोपवाटिकेतील कामे व महापालिका उद्यानाची देखभाल दुरुस्ती, वृक्षारोपण तसेच प्रभाग अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. सध्या रोपवाटिकेत शोभिवंत झाडांबरोबरच आष्ौधी झाडे आहेत. तसेच, गोल्डन दुरांडा, अरेलिया, बोगनवेल, तुळस, आंबा, फणस, फायकस, जास्वंद, कडुनिंब, चिंच, करंज, रेनट्री, मोहगणी, बांबू, गुलमोहर, अडूळसा, केशिया, बदाम, गुलमोहर, जांभूळ, चाफा ही रोपे ५ रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत आहेत. ही रोपे १ फुटापासून ते ४ फुटांपर्यंत आहेत. मात्र, बरीच रोपे रोपवाटिकेत उपलब्धच नसतात. ग्राहकांच्या मागणीनुसार रोपे मिळत नाहीत. कमी, जास्त, मध्यम रोपांसाठी ब्लॉक हवेत. तसेच आष्ौधी, देशी, विदेशी फुले व फळझाडांसाठी कॉलम असणे गरजेचे आहे. रोपवाटिकेत चांगल्या दर्जाचा रस्ता हवा. रस्त्याअभावी रोपवाटिकेत पावसाळ्यात पाय टाकणे अडचणीचे होत आहे. रोपवाटिकेतील रोपांचे नियोजन हवे. कर्मचारी व अधिकारी यांमध्ये एकसूत्रता असणे गरजेचे आहे. या अभावामुळे याचा परिणाम रोपवाटिकेवर दिसून येत आहे.पालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या रोपवाटिकेला अवघ्या काही हजारांवर वार्षिक उत्पन्न मिळत आहे. ही रोपे शाळा, महाविद्यालये, संस्था, कंपन्यांना कमी दराने दिली जातात. मात्र, प्रचार-प्रसाराअभावी रोपांचा खप कमी होत आहे. महापालिकेला गतवर्षी रोपांची झालेली विक्री व त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न अत्यल्प आहे.