शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मतदारयादी दुरुस्त कधी होणार?

By admin | Updated: January 13, 2017 02:42 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक आयोगाने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक आयोगाने बैठक घेतली. या वेळी आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारयादी सदोष आहे, अशा तक्रारी केल्या. उमेदवारी अर्ज कसा भरावा, येथपासून तर जमाखर्च कसा ठेवावा याविषयी माहिती घेतली. प्रभागांमध्ये फ्लेक्सवर कारवाई कधी होणार असे प्रश्न विचारले. महापालिका भवनात निवडणूक विभागाच्या वतीने अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यात बैठक घेतली. या वेळी आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वैशाली जाधव माने, वि. स. पळसुले, भीमराव शिंगाडे, अजय चांदखेडे, अरूण वायकर, श्रीधर जाधव, सहायक आयुक्त प्रद्श्री तळदेकर, वाय.एन कडूसकर, प्रवीण आष्टीकर, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. या बैठकीत मतदार याद्यासंदर्भात तक्रारी केल्या. निवडणूक विभागाचा वॉच बोपखेल परिसरातील राजकीय फलक, अण्णासाहेब मगर स्टेडीयम परिसरात कार्यक्रम सुरू आहे, अशा तक्रारी आल्या त्याविषयी आयुक्तांनी प्रशासनास आदेश दिले. चारपैकी एकाच उमेदवारास मतदान करू शकतो का, नामनिर्देशन पत्र दाखल करताना कोणती अ‍ॅफेडेविट जोडावेत, अशी मते राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या वेळी आयुक्त वाघमारे यांनी शंकांचे निरसन केले. आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे डॉ. माने यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. चारपैकी एका उमेदवारास मतदान करू शकतो, मात्र, मतदानानंतर एन बटन दाबायचे आहे.  सोशल मीडियावरही निवडणूक विभागाचा वॉच असणार आहे, तसेच सायबर क्राईमच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही होईल. असे असे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींची पाठ : शहराध्यक्षांची दांडीनिवडणूक विभागाने बोलावलेल्या बैठकीस प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष गैरहजर होते. बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले. खासदार आमदारही या बैठकीला फिरकले नाहीत. काँग्रेसचे संग्राम तावडे, भाजपाचे रामकृष्ण राणे, माऊली थोरात, राष्ट्रवादी काँग्रेचे रामदास मोरे, शिवसेनेचे भगवान वाल्हेकर आदी शहराध्यक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एमआयएमचे अखिल मुजावर हेही उपस्थित होते. त्याशिवाय हिंद काँग्रेस पार्टीचे अरुण मालुसरे, राष्ट्रीय बाल्मिकी सेनेचे राजेंद्र छाजछिडक, राष्ट्रीय बाल्मिकी सेना पक्षाचे पुरणचंद्र डिलान उपस्थित होते. तर मनसे, बसपाचे पदाधिकारी अनुपस्थित होते.