शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा होतोय अपव्यय

By admin | Updated: April 24, 2017 04:49 IST

औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा

वाकड : औद्योगिकनगरी म्हणून ओळख मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात अलीकडे लग्नसोहळे जणू मेगा इव्हेंट बनले आहेत. अशा व्हीआयपी लग्नात दिल्या जाणाऱ्या पंचतारांकित जेवणाबरोबर बाटलीबंद मिनरल पाणी देण्याची प्रथा रुजली आहे. मात्र या बाटलीबंद पाण्याच्या सोयीमुळे अशा लग्नात लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. आयटी पार्कमुळे वाकड, हिंजवडीसह पंचक्रोशीत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. यातूनच अलीकडच्या काळात तयार झालेल्या गुंठामंत्र्यांनी लग्नसोहळा एक प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यामुळे अशा गुंठामंत्र्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी आणि आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेकांना नाइलाजाने लग्नात वारेमाप खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागात होणाऱ्या लग्न समारंभात यजमानांना पिण्यासाठी सर्रास बाटलीबंद पाणी दिले जात आहे. साधारणत: अशा मिनरल पाण्याच्या बाटल्या बाजारात एक, अर्धा अथवा अडीचशे मिली आकारात मिळतात. मात्र एखाद-दुसरा पाहुणा सोडला, तर कोणताही माणूस एकावेळी सर्व बाटलीभर पाणी पित नाही. एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित बाटलीबंद तिथेच ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक बाटलीत किमान ८० टक्के पाणी शिल्लक राहते. अशा अर्धवट पाण्याने भरलेल्या बाटल्यांचा अक्षरश: ढीग मंगल कार्यालयात पाहायला मिळतो. या बाटल्यांत लाखो लिटर शुद्ध पाणी तर वाया जातेच. त्याचबरोबर लाखो रुपयांचा चुराडादेखील होतो. शिवाय या बाटल्या प्रदूषणाला खतपाणी घालत आहेत. (वार्ताहर)