शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

वाकडमध्ये सुरू आहे गार्इंच्या चा-यासाठी भिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:35 IST

पैसे साठविण्यासाठी भिशी सुरू केली जाते. पण दान करण्यासाठी भिशी चालविली जात असेल, तर आश्चर्यच वाटेल ना, हो पण हे सत्य आहे.

बेलाजी पात्रे वाकड : पैसे साठविण्यासाठी भिशी सुरू केली जाते. पण दान करण्यासाठी भिशी चालविली जात असेल, तर आश्चर्यच वाटेल ना, हो पण हे सत्य आहे. भोसरी पांजरपोळ गोरक्षा संस्थेला थेरगाव डांगे चौक आणि वाकडमधील श्री चामुंडा राजस्थानी व्यापारी असोसिएशनच्या भिशीतून दर पंधरा दिवसांनी चारा दान करण्यात येत आहे. त्यामाध्यातून व्यापाºयांनी वेगळा आदर्श ठेवला आहे.सर्व व्यापारी बांधव सभासदांकडून दर चौदा दिवसांनी पाचशे रुपये जमा केले जातात आणि ज्याच्या नावाची चिट्ठी निघेल, त्याने मात्र दोन हजार रुपये द्यायचे असे पैसे जमा करून अमावस्या आणि पौर्णिमेला गायींसाठी चारा खरेदी केला जातो आणि मग सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चिल्या पिल्ल्यांसह मोटारी भरून भोसरी पांजरपोळच्या दिशेने रवाना होतात. पांजरपोळ येथे जाऊन मनोभावे सर्व गायींना तो चार चारला जातो. गेल्या चार महिन्यांपासून हा स्त्युत्य उपक्रम सुरूआहे.नुकताच तब्बल तीन टन चारा (इलायती लसूण मेथी गवत) येथील तेराशे गायींना चारण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष भुराराम भाटी, सुभाष सरोदे, हिम्मत भाटी, प्रकाश जैन, कैलास घोरपडे, मोहनलाल भाटी, अक्षय गायके, केसराम सीरवी, हिरालाल सीरवी, रमेशकुमार परमार, हिरालाल देवडा, कुमाराम चौधरी, पूर्णाराम चौधरी, प्रमोद देवासी, सोळंकी, शांताबाई भाटी, ममता सोळंकी, पुष्पा भाटी, ललिता परमार, गॅरी भाटी, नरभदा भाटी आदी उपस्थित होते.या भिशीत सध्या ३० सभासद आहेत. मात्र, हळूहळू सभासद संख्या वाढत आहे. राजस्थानी महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत आहेत.आमावस्या व पौर्णिमेला हा उपक्रम राबविला जातो. श्री चामुंडा गोसेवा या भिशीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर चा-यासाठीची लगबग सुरू होते. सूचनांचे संदेश धडाडू लागतात आणि बघता बघता १७ हजार रुपये जमतात आणि मग सुरू होतो चा-याचा शोध़ प्रत्येक वेळी वेगवेगळाम्हणजेच कडवळ, मका, घास, गवत, कडबा, बाजरी आदी चारा दिला जातो.