शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

फी न भरल्याने वर्गात बसण्यास मज्जाव

By admin | Updated: June 27, 2017 07:30 IST

मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेत दोन विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली न भरल्याने बसू दिले जात नसल्याची व शाळेने अनधिकृतरीत्या

लोकमत न्यूज नेटवर्ककिवळे : मामुर्डी येथील लायन्स क्लबच्या शाळेत दोन विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली न भरल्याने बसू दिले जात नसल्याची व शाळेने अनधिकृतरीत्या फी वाढ केल्याची तक्रार देहूरोड येथील एका पालकाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे केली आहे. मात्र, संबंधित पालकाने दिलेल्या तक्रारीतील मजकूर खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.देहूरोड येथे राहणारे मेहरबान सिंग तक्की यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची नमनप्रीत कौर (दुसरी) व सरबजितसिंग तक्की (पहिली) ही दोन मुले लायन्स क्लबच्या शाळेत शिकत आहेत. बुधवारी (दि. २१) मुलांना त्यांनी शाळेत पाठविले असता, संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाढीव फी भरली नसल्याने वर्गात बसू दिले नाही. शाळेने अनधिकृतपणे फी वाढ केली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांच्या नावे गुरुवारी (दि.२२) एक पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेच्या वर्गात बसू न देणे अथवा वगार्बाहेर बसविणे शिक्षण हक्क अधिनियम २००९ कायद्यान्वये बेकायदा असून, अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना वर्गात बसू द्यावे, तसेच शाळेतील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश या पत्रात दिले आहेत. याबाबत लायन्स क्लब एज्युकेशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित पालकाने त्यांच्या एका पाल्याची फी भरण्याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही फी भरलेली नाही. संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेच्या सचिवाने स्वत: फी भरली असून संबंधित पालकाने फी नंतर भरतो असे सांगून अद्यापही भरलेली नाही. संस्था कायमस्वरूपी अनुदानित या पद्धतीने शासनमान्य असून, फी हेच शाळेचे उत्पन्न साधन आहे. शासनाचे सर्व नियम पाळून २५ टक्के आरक्षित तत्त्वावर जिल्हा परिषदेकडून पुरस्कृत केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत.