शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू वस्तीत वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार

By admin | Updated: June 3, 2016 00:36 IST

पिंपरी, भाटनगर, नेहरुनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटा स्कीम अशा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक या घटना नवख्या नाहीत.

पिंपरी : पिंपरी, भाटनगर, नेहरुनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटा स्कीम अशा झोपडपट्टी भागातील रहिवाशांना वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक या घटना नवख्या नाहीत. झोपडपट्टी दादा, स्थानिक गुंडांच्या टोळक्यांकडून झोपडपट्टीत असे प्रकार घडतात. परंतु प्राधिकरणासारख्या उच्चभ्रू वस्तीत वाहनांची तोडफोडीचे प्रकार घडू लागल्याने नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. उच्चभ्रू, अत्यंत शांत आणि सुरक्षित गणल्या जाणाऱ्या प्राधिकरण परिसराला दोन दिवसांपूर्वीच्या वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकाराने दहशतीच्या घटनेचे गालबोट लागले. ज्या ठिकाणी झाडाचे पान गळून पडल्याचा आवाजही सहज जाणवतो. अशा पेठ क्रमांक २५,२७,२८ च्या परिसरात दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने धुमाकूळ घातला. रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारींवर दगडफेक केली. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान केले. प्राधिकरण, भेळ चौक, हेडगेवार भवन, गणेश तलाव परिसरात ३१ मेच्या रात्री ठिकठिकाणी मोटारींच्या फुटलेल्या काचा पडल्या होत्या. दगड पडल्याने आलिशान मोटारींच्या काचांना तडे गेल्याचे दृश्य पहावयास मिळाले. उद्योजक, व्यावसायिक आणि उच्चपदस्थ अधिकारी यांचे वास्तव्य असलेल्या या प्राधिकरण परिसरात दहशत माजविण्यासाठी असे कृत्य करण्यामागील उद्देश काय असावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्राधिकरणालगतच्या बिजलीनगर भागातही असाच धुमाकूळ घालण्यात आला. रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडाली. गाड्यांची तोडफोड करणारे पसार झाले. कोणीच हाती लागले नाही. गुरुद्वारा परिसरात यापूर्वी दहशत माजविण्यासाठी महाकालीच्या टोळीकडून वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. महाकालीच्या एन्काउंटरनंतर या भागातील असे प्रकार थांबले. नेहरूनगर,भाटनगर, विठ्ठलनगर, निगडी ओटास्कीम आणि विद्यानगर या झोपडपट्टी भागात, तसेच भोसरी आणि थेरगाव गावठाण परिसरात गेल्या वर्षभरात वाहनांच्या तोडफोडीच्या, तसेच वाहने पेटवून देण्याच्या घटना घडल्या आहेत. दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांच्या टोळक्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली. अनेक गुंडांवर मोक्का, तडिपारी, एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाईमुळे झोपडपट्टी परिसरातील दहशत माजविण्याचे प्रकार कमी झाले. प्राधिकरणासारख्या वसाहतीत आता असे प्रकार घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)