शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 23, 2017 02:46 IST

महापालिका निवडणूक क प्रभाग निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग

नेहरुनगर : महापालिका निवडणूक क प्रभाग निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ९, १०, २० मतमोजणी करिता जय्यततयारी करण्यात आली असून ७० निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एक निवडणूक निर्णय अधिकारी, तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १२ झोनल अधिकारी असे एकूण ७० निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचीही मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीकरिता कार्यालयाच्या आवारात भव्य मांडव टाकण्यात आला आहे. मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल लावण्यात येणार असून पोस्टल मतांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे.एका वेळी एकाच प्रभागाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीस सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. प्रथज्ञ प्रभाग क्रमांक ९ ची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीचे व्हिडीयो चित्रीकरण करण्यात करण्यात येणार आहे.प्रत्येक मतमोजणी फेरीनंतर निकाल नागरिकांसाठी लाऊडस्पीकरवर जाहिर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यालयाच्या दोन्हीं बाजूला लाऊडस्पीकर लावण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक पक्षाच्या पॅनलच्या उमेदवारासह १४ प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार व प्रतिनिधी यांना ओळखपत्रा पत्राशिवाय निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी दरम्यान क प्रभाग निवडणूक कार्यालया समोरिल नेहरुनगर - भोसरी हा रस्ता हॉकी स्टेडियम पर्यंत तर दुसऱ्या बाजूला क प्रभागापासून काही अंतरावर असलेल्या बालाजीनगरकड़े जाण्यासाठीच्या मार्गावर असलेल्या वळणापर्यंत रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नेहरुनगर-भोसरी मार्गावरील वाहतूक हॉकी स्टेडियम येथून गवळीमाथा पर्यायी मार्गे सोडण्यात येणार आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)