तळवडे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना तळवडे आणि चिखली परिसरातील भाग एकत्र करून प्रभागरचना केली. यात तळवडे आणि रुपीनगर भागाचे विभाजन करून तळवडे गावावर अन्याय झाला असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बैठकीत निवडणूक प्रशासनाचा एकमुखाने निषेध करण्यात आला. प्रभागरचनेत तळवडे गावठाणाला न्याय मिळाला नाही, तर एकही नागरिक मतदान करणार नाही. आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर तळवडे ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहेत.या वेळी तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत अशा प्रकारची रचना झाली नव्हती. यापुढे हरकती घेऊन प्रभागरचना बदलण्यासाठी प्रशासनाला भाग पाडणे, आंदोलन, मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)
...तर मतदानावर तळवडेकरांचा बहिष्कार
By admin | Updated: October 12, 2016 02:12 IST