शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुधा पूल : शंभरी पार करुनही वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:17 IST

तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

देहूगाव - तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाची स्थिती धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पुलावर, तसेच जवळच अनेक अपघात झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेतल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक करीत आहेत.प्रामुख्याने खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतून शेतीची उत्पादने व भाजीपाला (तरकारी) मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. या परिसरातील भाजीपाला व धान्य पूर्वी तळेगाव, चिंचवड व देहूरोड रेल्वे स्टेशनकडे बैलगाडीच्या मदतीने आणला जात होता. मात्र, रस्त्यात नद्यांचे अडथळे येत होते. यापैकी देहूरोड व तळेगाव रेल्वे स्टेशनला जोडणाºया या तळेगाव-चाकण रस्त्यावर १९१२ मध्ये सुधा नदीवर पूल बांधण्यात आला. पुलामुळे पावसाळ्यातही मालाची वाहतूक सहज आणि वेगाने होऊ लागली. सध्या तळेगाव-चाकण हा रस्ता अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा जुना व महत्त्वाचा राज्य मार्ग आहे.औद्योगिकीकरणामुळे याच रस्त्याकडेच्या खालुंब्रे, म्हाळुंगे (इंगळे), खराबबाडी, नाणेकरवाडी अशा गावांचा विकास झाला. याच रस्त्याला जोडणाºया आंबेठाण, शिंदे, वासुली, सुदुंबरे ही गावेही विकसित होत आहेत. परिणामी कामगार ववाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या सुरुवातीला देहूफाटा, तळेगाव व चाकणच्या बाजू अशा दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच पुलाला समांतर पूल उभारण्यात आला आहे. त्याच्याही सुरुवातीला हे खड्डे पाहायला मिळतात. हे खड्डे इतके मोठे आहेत, की कोणतेही वाहन सहज उलटू शकते.वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीत जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. तळेगावकडून चाकणकडे जाताना तर सुधा नदीच्या पुलाच्या मध्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हा पूल धोकादायक झाला आहे.हा पूल १०० वर्षांचा झाला असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक होऊ शकतो, असे पत्रही मागे ब्रिटिश सरकारने पाठविले होते. या पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटलेले आहेत. प्रवेश करतानाच वळण असल्याने वाहने वेगाने येत असतात. अपघात झाल्यास या भागात वाहने थेट नदीपात्रात जातात. पुलाच्या खालील बाजूला दगडी भिंतीवर पिंपळाची झाडे उगवली असून, झाडांची मुळे भिंतीत गेली आहेत. यामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महाडसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत काय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड