शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

विद्यार्थी एका शाळेचे; बस दुसऱ्याच शाळेची...

By admin | Updated: August 7, 2015 00:38 IST

संत तुकारामनगर येथील संत तुकाराममहाराज पुतळा चौकातून बस सुरू. बसवर कोणत्याही शाळेचे नाव नाही. रंग पिवळा. संत तुकारामनगर हॉकर्स झोन,

संत तुकारामनगर येथील संत तुकाराममहाराज पुतळा चौकातून बस सुरू. बसवर कोणत्याही शाळेचे नाव नाही. रंग पिवळा. संत तुकारामनगर हॉकर्स झोन, शनी मंदिर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, भारतीय जैन विद्यालय, बौद्ध विहार चौक, संत तुकारामनगर पोलीस चौकी, महेशनगर चौक येथून पुढे आतील रस्त्याने महेशनगर येथील प्रथमेश शाळा. येथून पुढे नेहरुनगर संतोषी माता चौक, झीरो बॉइज चौक, मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौकमार्गे भाजी मंडई, हेडगेवार मैदानमार्गे अखेर ही बस एस. एस. अजमेरा विद्यालयाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ थांबली. या वेळी आम्हाला कळाले, या बसमधील विद्यार्थी या शाळेतील आहे.नेहरुनगर : बुधवार, दि. ५ वेळ : सकाळी ११.३०. बस क्र : एमएच ०४ जी ७७६७आसन क्षमता १७बस १७ आसनी असली, ४०पेक्षा अधिक विद्यार्थी यामध्ये होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चालकाशेजारच्या केबिनमध्ये काचेला चिकटून बसले. बस गच्च भरलेली असतानाही अनेक टप्प्यांवरील विद्यार्थी बसमध्ये चढत होते. वळण घेण्यापूर्वी चालक इंडिकेटर दाखवत होता; पण वळण पूर्ण झाल्यावर इंडिकेटर बंद करण्यास नेमका विसरत होता. मात्र, यामुळे मागील वाहनचालक गोंधळून जात होते. बसमध्ये एक महिला मुलांची सुरक्षा व देखरेखीसाठी होती. त्यामुळे अनेक टप्यावर बस थांबत असताना, विद्यार्थी बसमध्ये चढल्यानंतर दरवाजा मात्र काचेला चिकटून बसलेले विद्यार्थीच उघडझाप करत होते. मदतनीस महिला बसूनच होती. बस धावत असताना काही विद्यार्थी खिडक्यांतून धोकादायकरीत्या हात बाहेर काढून काही नागरिकांना गंमत म्हणून हाय-बाय करत होते.एस. एस. अजमेरा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काही उभ्या असलेल्या बसवर वेगवेगळया शाळेचे नावे लिहलेली होती. याबद्दल या बसच्या वाहकाला विचारले असता तो म्हणाला, आम्ही सकाळी एका शाळेची, दुपारी एका शाळेची वाहतुक करतो. तसेच या शाळेने आम्हाला अधिकृत पत्र दिले नसल्यामुळे आम्ही गाडीवर नावे लिहिलेली नाहीत. या ठिकाणी थांबलेल्या बऱ्याच बसमधील काही बसची पाहणी केली असता त्यामध्ये अग्निशामक यंत्रच लावलेले नसल्याचे निदर्शनास आले. वास्तविक आरटीओ नियमाचा हा भंग आहेच शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे या बसमालकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणली आहे.बसमधून आपल्या मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पालकांशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना जाणवले की केवळ नाईलाज म्हणून आम्ही बसमधून मुलांना पाठवतो. वडील सकाळी नोकरी-कामधंद्यावर जातात आणि आईला दोन मुलांचे आवरून, जेवण, डबा करून दररोज शाळेला सोडणे हे शाळांच्या बसमध्ये मुलांना खचाखच भरणे, योग्य ती वागणूक न देणे, बस वेगाने चालविणे यामुळे विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विद्यार्थ्यांना बसतोय भुर्दंड शाळेच्या बस वेळेवर पाल्याला नेण्यास न आल्याने याचा भुर्दंड शाळेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. याची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगवी लागत आहे. उशीरा शाळेत आल्यामुळे मुख्याध्यापकाकडे तक्रार जात आहे. यामुळे शिक्षक शिस्तपालन न केल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून घरी हाकलून देत आहेत. असे काही पालकांनी सांगितले. पालकांनी वारंवार तक्रार करुनही बस चालक मात्र बिनधास्त राहत आहेत. धोकादायक वेग लहान मुलांना ने - आण करणाऱ्या बसचा वेग हा कमी नसल्यामुळे काही मुले खेळताना बऱ्याच वेळा बसमध्ये तोंडावर आपटली आहेत. कासारवाडी, चिंचवड पिंपरी मधील काही शाळांमध्ये हे प्रकार घडत आहेत. काही वेळा मुलांना यामुळे दुखापत झाली आहे. बस चालकांची रेस लागल्यासारखी बस वाहतूक कोंडीतून काढण्याचा चालकाचा प्रयत्न असतो. यामुळे बसच्या खिडक्यांना मुठीत धरुन लहान मुले बसमध्ये बसलेली असतात. बसचा जीवघेणा प्रवासघरातील पालक नोकरीसाठी बाहेरगावी अथवा दूर अंतरावर असल्याने पाल्याला बस शिवाय पर्याय नसतो. यामुळे पाल्याला बसची सवय करुन घ्यावी लागत आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा बस खूप वेळा उशीरा येत असल्याने किंवा काही वेळा खुपच लवकर येत असल्याने मुलांना वेळेअगोदर खुप वेळा घरी आवरुन बसावे लागते. बस कोणत्याही वेळेत घरी येते. यामुळे पालक बुचकाळ्यात पडतात.सुविधा, सुरक्षिततेसंबंधीचे नियमवाहन १५ वर्षांपेक्षा जास्त जुने नसावेचालक पाच वर्षाचा अनुभवी असावाचालकाशिवाय एक सहवर्ती असणे गरजेचेपालिका हद्दीत वेगमर्यादा ४० प्रतिकिमी असावीव्हॅनमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, पत्त्यासह संपर्काच्या माहितीची यादी असावीवाहनाला प्रेशर हॉर्न नसावा१२ आसन क्षमतेच्या व्हॅनमध्ये एक अग्निशामक उपकरण आवश्यकस्कूलबसमध्ये ५ किलो क्षमतेची दोन अग्निशामक उपकरणे ठेवणे बंधनकारकप्रथमोपचार पेटीची सुविधा आवश्यक बस परवान्यासाठी आवश्यक नियमबस कंत्राट वाहन परवान्यासाठी वाहनाला पिवळा रंगपुढील, मागील बाजुस स्कूल बस लिहिलेले असावेवाहनाच्या खिडकीखाली १५० मिमी लांबीचा विटकरी पट्टाविटकरी पट्यावर शाळेचे नाव लिहिलेले असावे चढण्याची पायरी २२० मिमीपेक्षा जास्त उंच नसावीआसन क्षमतेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक