शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पोलिसांची ओढाताण'

By admin | Updated: February 13, 2017 01:37 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीच झटते; मात्र निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पोलीस यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू झाली.

वाकड : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीच झटते; मात्र निवडणुकीचे पडघम वाजू लागताच पोलीस यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया आणि विविध पक्षांच्या पॅनलचा प्रचार आणि दररोज निघणाऱ्या रॅलींना आवरताना पोलिसांची मोठी ओढाताण होऊन दैनंदिन कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. उमेदवारांना कायद्याचा धाकनिवडणुकीचे बिगूल वाजताच पोलीस यंत्रणा तेवढीच सजग आणि सज्ज झाली. महापालिकेच्या निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून खुर्चीसाठी वाट्टेल ते म्हणत एकमेकांच्या जीवावर उदार झालेले अनेक उमेदवार केवळ पोलीस यंत्रणा आणि कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या भीतीपोटी शांत आहेत. मात्र तरीही या तणावाच्या वातावरणात अनेक उमेदवारांच्या रॅली, प्रचार सभा, कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त द्यावा लागत आहे. अनेकदा एकाच प्रभागातून दोन-तीन उमेदवारांच्या रॅली आगे-मागे निघत असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. 'अपुरे मनुष्यबळनिवडणूक लढवीत असलेल्या विविध पक्षांचे चार-चार उमेदवार आणि अपक्ष या सर्वांचाच निवडणूक कार्यक्रम, प्रचार जोरदार सुरूआहे. मात्र तुटपुंजे मनुष्यबळ असलेल्या पोलीस यंत्रणेवर ताण अनंत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. सध्या ‘ड’ प्रभाग कार्यालयासाठी वाकड पोलिसांचे एक अधिकारी, ४ कर्मचारी तैनात आहेत. तर थेरगाव करसंकलन कार्यालयात दोन अधिकारी दोन कर्मचारी आहेत. प्रभाग २५ वाकड ताथवडे पुनावळेसाठी पोलिसांचा एक अधिकारी, एक कर्मचारी आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच अर्ज दाखल करण्यासाठी अर्जासोबत जोडायच्या असलेल्या अनेक एनओसी मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांत धांदल उडाली. यानंतर अर्जस्वीकृती, छाननी, इच्छापत्र भरून देणे, माघार आणि अपक्षांना चिन्हवाटप अशा अनेक क्लिष्ट प्रक्रिया प्रभागनिहाय पार पडल्या. या दरम्यान एक खिडकी योजनेद्वारे उमेदवारांना मदत झाली. मात्र या सर्व निवडणूक कार्यक्रमासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयावर पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने या सर्व बाबी ठरावीक घटना वगळता निर्विघ्न पार पडत आहेत. निवडणूक लागताच सर्वांत जादा कसरत पोलिसांची होत आहे. काही पोलीस ठाण्यांच्या पोलिसांच्या हद्दीत पंचायत समिती हिंजवडी गण, माण गण, जिल्हा परिषदेचा माण गट, पुणे मनपाचा प्रभाग क्रमांक ९ व १०, तसेच पिंपरी-चिंचवड मनपा प्रभाग २५ ‘ड’ प्रभाग आदी भाग असल्याने तुटपुंज्या मनुष्यबळाद्वारे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौक येथे २४ तास हा नाकाबंदी पॉईंट केल्याने येथे दोन पाळीत एक अधिकारी आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत. (वार्ताहर)