शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

संपकरी कामगारांचा रास्ता रोको

By admin | Updated: January 22, 2016 01:23 IST

तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाचा दहावा दिवस बैठका आणि रास्ता रोकोमुळे गाजला

तळेगाव स्टेशन : तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या कामगारांनी पुकारलेल्या संपाचा दहावा दिवस बैठका आणि रास्ता रोकोमुळे गाजला. कामगारांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीतही जुने मुद्देच पुन्हा समोर आल्याने कामगार आणि एमआयटी व्यवस्थापन यांच्यात समेटाचे प्रयत्न फोल ठरले. बैठकीनंतर दुपारी दोनच्या दरम्यान तळेगावातील सर्वपक्षीय पुढारी आणि कामगारांनी चाकण-तळेगाव रस्त्यावर मोर्चा काढून अर्धा तास रास्ता रोको केले.हॉस्पिटलच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुणे जिल्हा मजदूर संघातर्फे तळेगाव-चाकण मार्गावरच मोर्चा काढून सभा घेत अर्धा तास रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाठिंबा देण्यासाठी नगराध्यक्षा माया भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे (सरकार), भाजपाचे नगरसेवक सुशील सैंदाणे, गणेश भेगडे, आरपीआय, शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने सकाळीच जादा कुमक मागविली होती. पोलीस अधीक्षक जय जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, सहायक निरीक्षक राजेंद्र पाटील, वायसिंग पाटील, देहूरोड ठाण्याचे निरीक्षक अमर वाघमोडे आदींनी खबरदारी घेत परिस्थिती हाताळली. आंदोलनावेळी झालेल्या भाषणात बोलताना उपनगराध्यक्ष खांडगे यांनी व्यवस्थापनाने बाहेरून दोनशे गुंड आणल्याचा आरोप करून मंगेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ते म्हणाले, ‘येत्या दोन दिवसांत उर्वरित मागण्या मान्य केल्यास सर्व कामगार आणि कर्मचारी डॉक्टरांना सहकार्य करतील. परंतु, एकाही कामगाराच्या केसाला धक्का लागला, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.’’मजदूर संघाचे बाळासाहेब भुजबळ म्हणाले की, कामगारांच्या मागण्या पूर्ण होऊन न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार आहोत.(वार्ताहर)