शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना वेग

By admin | Updated: January 25, 2017 02:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन निवडणूकप्रक्रियेत व्यग्र असताना शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे फोफावली

रावेत : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन निवडणूकप्रक्रियेत व्यग्र असताना शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. विशेषत: भोसरी, च-होली, दिघी, मोशी, कृष्णानगर, संभाजीनगर, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी या भागात बिनधास्तपणे अशी बांधकामे आजही सुरू आहेत. त्यामुळे अगोदरच्या अनधिकृत बांधकामात आणखी भर पडली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फक्त ४० हजार गुंठेवारीची बांधकामे होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार काही वर्षांपूर्वी दंडात्मक कारवाईने त्यातील अर्धी बांधकामे नियमित करण्यात आली. आरक्षित अथवा रस्त्याच्या जागेवर असल्याने गुंठेवारीच्या अर्ध्या अधिक बांधकामांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. महापालिका प्रशासनाला शहरात कुठे कुठे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत हे माहीत असूनही कारवाई होत नसल्याने अशी बांधकामे करणाऱ्यांचे धाडस वाढले. बहुतेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अशी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे गेल्या दहा-पंधरा वर्षांत प्राधिकरण आणि महापालिका क्षेत्रात मिळून सुमारे लाख ते दीड लाख अनधिकृत बांधकामे वाढल्याचा अंदाज आहे. काळेवाडी, थेरगाव, गणेशनगर, कस्पटेवस्ती, वाकड रस्ता या भागातसुद्धा अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. (वार्ताहर)