शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

स्लोगन तयार करणाऱ्यांचा भाव वधारला

By admin | Updated: February 13, 2017 01:50 IST

निवडणुकीमध्ये प्रचाराचे स्लोगन खूपच महत्त्वाचे असते. अगदी नेमक्या शब्दांमध्ये मतदारांना पटणारे स्लोगन, प्रचारासाठीची पत्रके, भाषणं

पिंपरी : निवडणुकीमध्ये प्रचाराचे स्लोगन खूपच महत्त्वाचे असते. अगदी नेमक्या शब्दांमध्ये मतदारांना पटणारे स्लोगन, प्रचारासाठीची पत्रके, भाषणं यामधील मजकूर तयार करून देणाऱ्यांना सध्या मोठी मागणी आहे. मतदारांपर्यंत उमेदवाराची माहिती, चिन्ह पोहोचविण्यासाठी हा मजकूर लिहून देणाऱ्यांचा (कंटेन्ट राइटर) यांचा भाव वधारला आहे.महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था, पीआर एजन्सी कार्यरत आहेत. प्रचारासाठी तरुण मुले-मुली उपलब्ध करून देण्यापासून ते त्या उमेदवाराचे ब्रँडिंग करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा त्यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत.उमेदवारी अर्ज भरणे, माघारी आणि त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवार आता झोकून देऊन प्रचाराला लागले आहेत. छोट्या छोट्या प्रचारसभा व पदयात्रांना आता सुरूवात झाली आहे. काही संस्थांकडून प्रचारांच्या भाषणांसाठी उमेदवारांना मुद्दे तयार करून दिले जातात. उमेदवारांबरोबर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनीही कोणत्या मुद्द्यांवर भर द्यावा, यासाठी या संस्थांची मदत घेतली जात आहे. पदयात्रा व प्रचार सभांबरोबर सोशल मीडिया हे देखील प्रचाराचे मोठे साधन बनले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी माध्यमांवर जोक, विरोधाभास दर्शविणारी विधाने टाकून पक्षाचा तसेच उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारा मजकूरही संस्थांकडून उपलब्ध आहे.जाहीरात तयार करणाऱ्या संस्थांकडून जाहिरातींसाठी आकर्षक स्लोगन तयार करून दिली जातात, पूर्वी राजकीय जाहिरातींसाठीही याच संस्थांची मदत घेतली जायची. मात्र आता शहराच्या राजकारणाची चांगली माहिती असलेल्या व्यक्तींची मदत यासाठी घेतली जात आहे. विरोधकांना नेमक्या कोणत्या मुद्द्यावर खिंडीत पकडायचे याचा अभ्यास करून त्यानुसार कृती केली जात आहे, अशी माहिती प्रवीण पगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)