शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गब्बर राजकारण्यांना घरचा रस्ता दाखवा

By admin | Updated: February 14, 2017 01:58 IST

राजकारण करून गब्बर होत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप

वाकड : राजकारण करून गब्बर होत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाकड येथे व्यक्त केले.आमदार जगताप यांच्या उपस्थितीत प्रभाग २६ चे भाजपाचे उमेदवार ममता गायकवाड, तुषार कामठे, आरती चोंधे व संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ वेणूनगर, वाकड परिसरात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा प्रारंभ जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अभ्यासू आणि समाजाची तळमळ असलेल्या भाजपा उमेदवारांना साथ द्या. विशालनगर-पिंपळे निलख,जगताप डेअरी, वाकड परिसरात विकासकामांची घोडदौड सुरूकरण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, ‘‘वाकडचा गेल्या २५ वर्षांत जो विकास झाला नाही, तो केवळ या पंचवार्षिकमध्ये झाल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामांना जनता न्याय देईल. प्रचार सभेनंतर उदंड प्रतिसादात आमदार जगताप यांच्या उपस्थितीत कावेरीनगर, पोलीस वसाहत, वेणूनगर, वाकड व कस्पटे वस्ती या परिसरात पदयात्रा काढण्यात आली. भाजपाला साथ द्या, विकासाला मत द्या, अशा घोषणांनी वातावरण दणदणून गेले. मोहन कस्पटे, नंदकुमार बालवाडकर, सायबराव थोपटे, सुरेंद्र तांबे, सुरेश इंगवले, संभाजी तांबे, नाना क्षीरसागर, सुभाष काकडे, निखिल कदम, सागर साळुंखे, हृषीकेश दुर्गे, महेश कामठे, प्रसाद कस्पटे यांच्यासह तरुण कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्यने उपस्थित होते. (वार्ताहर)