शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सातासमुद्रापारही संगीतमय दिवाळी

By admin | Updated: November 11, 2015 01:19 IST

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कलावंतांनी भारतीय संगीताचे सूर, ताल हे सातासमुद्रापार पोहोचविले आहेत. पिंपरीतील युवा तबलावादक समीर सूर्यवंशी आणि पुण्यातील संतूरवादक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील कलावंतांनी भारतीय संगीताचे सूर, ताल हे सातासमुद्रापार पोहोचविले आहेत. पिंपरीतील युवा तबलावादक समीर सूर्यवंशी आणि पुण्यातील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर यांची जुगलबंदी अमेरिकेतील सनहोजे येथे झाली. अमेरिकी रसिकांनी तबला आणि संतूर जुगलबंदीला उत्कट दाद दिली.इंडियन क्लासिकल म्युझिक फाउंडेशन आॅफ आर्ट फाउंडेशनच्या वतीने कॅलिफोर्नियातील सनहोजे येथील पॅलेस आॅफ फाइन आर्ट या सभागृहात संतूर आणि तबल्याची जुगलबंदी झाली. डॉ. दैठणकर हे पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असून, सूर्यवंशी हे तबलामहर्षी अनिंदो चटर्जी यांचे शिष्य आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीत ते समन्वय आहेत. अनेक नामवंत कलावंतांना त्यांनी साथ केली आहे. सोलो तबलावादनही सादर केले आहे. संगीत मैफलीत दैठणकर यांनी मधुवंती रागात ताल झपताल पेश केला. त्यानंतर द्रुत तीनए ताल पेश करीत रसिकांची दाद घेतली. संतूरवादनास सूर्यवंशी यांच्या बहारदार तबल्याने साथसंगत केली. त्यानंतर मिश्र शिवांजली राग वाजवून सुरेल मैफलीची सांगता झाली. सूर-तालाची मैफल रंगतदार ठरली. या वेळी संतूर आणि तबला जुगलबंदीचा अनुभव अमेरिकावासीयांनी घेतला. या विषयी सूर्यवंशी म्हणाले, ‘‘सातासमुद्रापारही भारतीय शास्त्रीय संगीताचा रसिकवर्ग मोठा आहे. अमेरिकेतील रसिकांना भारतीय संगीताचा नजराणा सादर करण्याची संधी मला मिळाली, ही आनंदाची गोष्ट होती. तिथे कलाविष्कार सादर करण्याचा अनुभव वेगळाच होता. नवा देश, नवा प्रांत तिथे भारतीय संगीताला कितपत दाद मिळणार, या विषयी मनात प्रश्न होते. मात्र, दैठणकर आणि मी सादर केलेल्या कलाविष्कारास भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमात भारतातील विविध प्रांतांतील नागरिक भेटले. त्यांनी मनापासून दिलेली दाद मी कधीही विसरू शकणार नाही. जागतिक पातळीवरही आपले संगीत किती लोकप्रिय आहे, याची जाणीव या कार्यक्रमनिमित्ताने झाली.’’ (प्रतिनिधी)