शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या रद्दसाठी धावाधाव

By admin | Updated: July 9, 2016 03:53 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी ५० मुख्य लिपिक, तसेच ७३ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या. तर शुक्रवारीही ५८ शिपाई आणि २५ मजुरांच्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी ५० मुख्य लिपिक, तसेच ७३ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या. तर शुक्रवारीही ५८ शिपाई आणि २५ मजुरांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आले. बदल्यांचे आदेश निघताच मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे. शिपाई पदावरील ५८ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये करसंकलन विभागातील सर्वाधिक २४ जणांचा समावेश आहे. यासह माध्यमिक शिक्षण विभागातील नऊ जणांची, स्थानिक संस्था कर विभागातील सहा जणांची इतर विभागात बदली करण्यात आली. तसेच वायसीएमएच, वैद्यकीय विभाग, नगर सचिव या विभागातील शिपायांच्याही बदल्या केल्या. यासह २५ मजुरांच्याही बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक वायसीएमएच रुग्णालयातील सात जणांच्या बदल्यांचा समावेश आहे. तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय आणि उद्यान विभागातील प्रत्येकी तीन जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह अ, ड, इ क्षेत्रीय कार्यालय, तसेच भूमी आणि जिंदगी, अभिलेख कक्ष, क्रीडा विभाग, नागरवस्ती विकास योजना या विभागातील मजुरांच्याही बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)- अनेक कर्मचारी हे पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत. तर काही कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील आहेत. बदल्यांबाबत समजताच संबंधित कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. बदली रद्द करावी, अमुक ठिकाणी बदली नको, अशी गळ घातली. पदाधिकारीदेखील कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्याबाबत संबंधितांकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.