शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन वीज बिल भरण्यास प्रतिसाद

By admin | Updated: April 10, 2017 02:35 IST

महावितरणच्या वीजबिलांची रक्कम आॅनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीजग्राहकांचा मोठ्या

पिंपरी : महावितरणच्या वीजबिलांची रक्कम आॅनलाइन भरण्यास पिंपरी व भोसरी विभागातील वीजग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात पिंपरी व भोसरी विभागात १८ लाख ९८ हजार वीजग्राहकांनी महावितरणच्या मोबाइल अ‍ॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तब्बल ३१२ कोटी १६ लाख रुपयांचा घसबसल्या भरणा केला आहे. २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत २०१६-१७ या वर्षी आॅनलाइन बिल जमा करणाऱ्यांची संख्या तब्बल पाच लाखांनी वाढली आहे. आॅनलाइन सुविधेमुळे वीजबिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागत नाही. केवळ एका क्लिकवर घरबसल्या बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पिंपरी, भोसरी विभागात २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण १३ लाख ९६ हजार वीजग्राहकांनी २२८ कोटी ६१ लाख रुपयांचा आॅनलाइन वीजबिल भरणा केला होता. तर सन २०१६-१७ या वर्षात १८ लाख ९८ हजार वीजग्राहकांनी ३१२ कोटी १६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात आॅनलाइन वीजभरणा करणाऱ्यांची संख्या पाच लाखांनी वाढ झाली असून, ८३ कोटी ५५ लाखांचा आॅनलाइन बिल भरणा वाढला आहे. पुणे परिमंडलमध्ये आॅनलाइन वीजबिल भरण्यात पिंपरी विभाग आघाडीवर असून, गेल्या आर्थिक वर्षात पिंपरी विभागात १२ लाख ७७ हजार ग्राहकांनी १७२ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. तर भोसरी विभागात ६ लाख २१ हजार वीजग्राहकांनी १३९ कोटी ९६ लाख रुपयांचा ह्यआॅनलाइनह्ण वीजबिल भरणा केला आहे. वीजग्राहकांना मुदतीत चालू देयकांचा, तसेच थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह संकेतस्थळ आणि अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय छापील कागदासह ई-मेलद्वारेही बिल मिळविण्याची सेवा उपलब्ध आहे. तसेच गो-ग्रीन अंतर्गत छापील कागदाऐवजी वीजबिलासाठी फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. याबाबतची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करण्यासाठी क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेटबॅँकिंगचा पर्याय उपलब्ध असून वीजदेयक भरण्याची मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह देयक आॅनलाइन भरण्याची सोय उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)