शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसाचे पाणी पेटणार

By admin | Updated: July 4, 2014 06:38 IST

आमदार विजय शिवतारे यांनी अडवणूक केल्यामुळे पुरंदर उपसा योजनेचे पाणी बारामती तालुक्यातील गावांना देण्यासाठी अडथळा येत आहे

मोरगाव : आमदार विजय शिवतारे यांनी अडवणूक केल्यामुळे पुरंदर उपसा योजनेचे पाणी बारामती तालुक्यातील गावांना देण्यासाठी अडथळा येत आहे, असा आरोप करीत आज बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निषेध व धरणे आंदोलन केले. शिवतारे यांना सुबुद्धी देण्यासाठी मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वरला बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभिषेक करण्यात आला.विधानसभा निवडणुकीपूर्वी बारामतीच्या जिरायती भागात पुरंदर उपसा योजनेचे पाणी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केली होती. मागील दीड वर्षापासून बारामतीच्या जिरायती भागातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीतदेखील उमटले. त्यामुळे युद्धपातळीवर या गावांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र, पुरंदरमधील दुष्काळी गावांनादेखील पाणी द्या, अशी मागणी करत शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीला पाणी वळविण्यावरून विरोध केला आहे.मात्र, केवळ भावनिक विरोध करून पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे या योजनेचे काम अडविले जात आहे, असा आरोप या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. बैठका घेऊन त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला आहे; मात्र शिवतारे विरोधासाठी विरोध करीत आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला. या संदर्भात आमदार विजय शिवतारे म्हणाले, बारामती तालुक्यातील गावांना पाणी देण्यास माझा विरोध नाही. मात्र, ज्याप्रमाणे तालुक्यातील गावे क्षेत्रफळाप्रमाणे सिंचनासाठी घेतली आहेत, त्याप्रमाणे पुरंदर तालुक्यातील गावे या योजनेत सिंचनासाठी समाविष्ट करून घ्यावीत. पंधरा वर्षे सत्तेवर राहूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन पवार राजकीय खेळी करीत आहेत.(वार्ताहर)