लोणावळा : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहर व नाणे मावळ राष्ट्रवादीच्या वतीने पशुसंवर्धनमंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर यांच्या पुतळ्याचे शिवाजीमहाराज पुतळा चौकात दहन करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादीचे लोणावळा शहराध्यक्ष राजू बोराटी, खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय गोसावी, मनोज लहूळकर, नारायण पाळेकर, मावळ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी, किरण हुलावळे, राजू देवकर, जाकिर खलिफा, सलिम मण्यार, अरुणा लोखंडे, शीलाताई बनकर, शुभांगी हाळवे, सुरेश कडू, रमेश भांगरे, राजू मावकर उपस्थित होते.वडगावमध्ये निषेधवडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने वडगाव येथे मोर्चा काढून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. बाळासाहेब नेवाळे गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, अतिश परदेशी, अर्चना घारे, सुभाष जाधव, सतीश येवले, रमेश गायकवाड उपस्थित होते.(वार्ताहर)
महादेव जानकर यांचा निषेध
By admin | Updated: October 13, 2016 01:43 IST